यवतचे ग्रामविकास अधिकारीही निलंबित

By admin | Published: July 9, 2015 02:18 AM2015-07-09T02:18:43+5:302015-07-09T02:18:43+5:30

आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून यवत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली.

Yavat's Rural Development Officer was also suspended | यवतचे ग्रामविकास अधिकारीही निलंबित

यवतचे ग्रामविकास अधिकारीही निलंबित

Next

यवत : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून यवत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली.
यवत ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार गावातील शब्बीर सय्यद व भारीप-बहुजन महासंघाचे दौंड तालुकाध्यक्ष उत्तम गायकवाड यांनी केली होती.
या तक्रारीत तथ्य आढळल्याने यवतचे सरपंच श्याम शेंडगे यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. यासाठी श्याम शेंडगे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, ग्रामविकासमंत्री व उच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. मात्र, सर्व ठिकाणी सरपंचांच्या विरोधात निकाल दिला गेला होता.
मोठ्या रकमांचे बेअरर चेक काढणे, कामांच्या निविदा न मागविणे आदी बाबतींत अनियमितता आढळल्याने शेंडगे यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांची केवळ बदली करण्यात आली होती. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याबाबत अधिक चौकशी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी सरपंच श्याम शेंडगे यांच्याबाबत दिलेल्या निकालात दिले होते.
त्यानुसार अधिक चौकशीत कामांच्या निविदा काढताना ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर न करणे, बांधकाम पूर्ण नसताना घरांच्या नोंदी करणे आदी बाबींमध्ये दोषी आढळल्याने ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांना निलंबित करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले.

कारभार चांगलाच गाजला
४यवत ग्रामपंचायतीचा कारभार मागील काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे चांगलाच गाजला
४सरपंच श्याम शेंडगे यांना पदावरून काढून टाकण्यात आले
४ त्यानंतर आता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनादेखील निलंबित करण्यात आले.
४ग्रामपंचायतीचा कारभार
पंचायत समितीपासून उच्च न्यायालयापर्यंत

Web Title: Yavat's Rural Development Officer was also suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.