यवतच्या ‘सिंघम’चा सत्कार
By Admin | Published: December 9, 2014 12:04 AM2014-12-09T00:04:15+5:302014-12-09T00:04:15+5:30
टपोरी रोड रोमिओंनी छेडछाड केल्यास मुलींनी न घाबरता रणरागिणीचा अवतार दाखवावा, असे आवाहन यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी केले.
यवत : टपोरी रोड रोमिओंनी छेडछाड केल्यास मुलींनी न घाबरता रणरागिणीचा अवतार दाखवावा, असे आवाहन यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी केले. यवतमध्ये शालेय मुलींची छेडछाड करणा:या रोड रोमिओंना यवत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्याबद्दल शालेय मुलींनी यवत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचा सत्कार करत आभार व्यक्त केले.
यवत मध्ये शाळा सुटल्यानंतर काही मुले दुचाकी वरुण येत शालेय मुलींना अपशब्द बोलत दुचाकी वरुण कट मारत निघून जात यामुळे मुली त्नासल्या होत्या.पालक व शिक्षक वर्गातून याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या.
काल (दि.4) रोजी सायंकाळी शाळा सुटल्या नंतर यवतचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस नाईक श्रवण गुपचे , दशरथ बनसोडे यांनी रोमिओगिरी करणा?्या युवकांना पकडून पोलिसी खाक्या दाखविला होता.त्यामुळे छेडछाड प्रकरण थांबले असून रोड रोमिओ चांगलेच धस्तावाले आहेत.
शाळा सुटल्या नंतर व तासाला जाताना रोड रोमिओ शालेय मुलींची छेडछाड करीत असल्याने मुलीं बरोबरच सवर्सामान्य पालाकांमध्ये देखिल घबराटीचे वातावरण होते.परंतु पोलिसांच्या कारवाई मुळे सदर प्रकार सद्य परिस्थिती मध्ये थांबला आहे.याबद्दल यवत स्टेशन रोड वरील देशमुख क्लासेसच्या विद्याथ्र्यांनी मुलींनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांचा सत्कार केला.
यावेळी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शालेय मुलींशी
संवाद साधताना त्यांनी मुलींचा आत्मविश्वास जागृत करत सर्वच क्षेत्नात मुली चांगली प्रगती करत आहेत.
मात्न ऐन उमेदीच्या वयात नसत्या गोष्टींमुळे त्यांचे लक्ष विचलित होते.कसलेही अत्याचार सहन
करू नका कोणी छेडछाड
केल्यास सरळ रस्त्यावरच त्यांना रनरागिनींचा अवतार दाखवा.स्त्नी अत्याचारा विरुद्ध कायदे बळकट आहेत त्यामुळे अश्या समाज कंटकांच्या विरोधात कड़क कारवाई केली जाईल यामुळे निर्भिड पणो तक्रार देखिल करण्याचे आवाहन सारंगकर यांनी केले.
शालेय मुली व मुलांशी संवाद साधल्या नंतर त्यांना पोलिसांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहर्यावर मैत्नीपूर्ण आनंद दिसून येत होता.