यवतच्या रोडरोमिओंना पोलिसी खाक्या
By admin | Published: December 6, 2014 04:16 AM2014-12-06T04:16:03+5:302014-12-06T04:16:03+5:30
यवतमध्ये शालेय मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना यवत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविला आहे. यवतमध्ये शाळा सुटल्यानंतर काही मुले दुचाकीवरुन येतात
यवत : यवतमध्ये शालेय मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना यवत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविला आहे.
यवतमध्ये शाळा सुटल्यानंतर काही मुले दुचाकीवरुन येतात. शालेय मुलींना अपशब्द उच्चारत दुचाकीवरुन कट मारत निघून जात. यामुळे मुली त्रासल्या होत्या. पालक व शिक्षक वर्गातून याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या.
काल (दि.४) रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर यवतचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस नाईक श्रावण ग्रुपचे, दशरथ बनसोडे यांनी रोमिओगिरी करणा-या युवकांना पकडून पोलिसी खाक्या दाखविला. यावेळी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले तर दोघे दुचाकीवरुन पसार झाले.
यापुढे यवत मध्ये रोड रोमिओ गिरी करणा-यांवर कड़क कारवाई करण्यात येणार आहे. मुलींना त्रास देणा-या अशा रोमिओंची माहिती मुलींनी, त्यांच्या पालकांनी अथवा शिक्षकांनी पोलिसांना निर्भिडपणे द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताना शाळेच्या परिसरातील रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)