year end review- 2021| विमाने थबकली, रेल्वे सुसाट तर ‘एसटी’ला ऐतिहासिक ‘ब्रेक’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:26 PM2021-12-31T12:26:03+5:302021-12-31T12:35:55+5:30
पुणे (लोहगाव) विमानतळावरून २४ तास विमानसेवा नोंव्हेबर महिन्यात सुरू झाली...
पुणे : धावपट्टीच्या दुरुस्तीनिमित्त ऑक्टोबर महिन्यांत पुणे विमानतळ १५ दिवस पूर्णपणे बंद होते. धावपट्टीचे काम मागील वर्षापासून सुरू होते. ते २०२१ मध्ये पूर्ण झाले. धावपट्टीची दुरुस्ती नंतर तिथे लाइटिंगचे काम करण्यात आले. त्यासाठी देखील रात्रीचे विमानांची उड्डाणे बंद होती. त्यामुळे या वर्षात विमानांचे उड्डाण थांबले. विमाने जमीन पर अशीच स्थिती होती. रेल्वेचे हडपसर टर्मिनल वाहतुकीसाठी खुले झाले. याचे काम पूर्ण झाले नसले तरीही आता हडपसर स्थानकांवरून गाड्याची वाहतूक वाढण्यास मदत होत आहे. २८ ऑक्टोबरपासून राज्यांत एसटीच्या संपाला सुरुवात झाली तर पुण्यात ८ ऑक्टोबरपासून संप सुरू झाले. हा संप अजूनही सुरूच आहे. एसटीच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात जास्त काळ चाललेला हा संप आहे.
पुणे (लोहगाव) विमानतळावरून २४ तास विमानसेवा नोंव्हेबर महिन्यात सुरू झाली. मात्र कोरोनाचा प्रभाव असल्याने २०२१ मध्ये देखील आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाली नाही. डिसेंबर महिन्यात पुणे ते दुबई व पुणे ते शारजासाठी एयर बबल कराराअंतर्गत सेवा सुरू करण्याच्या ठरले. मात्र ती सुरू झाले नाही. पुणे स्थानकांवरील भार कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनल सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊले पडली. फलाट दोन व तीनचे विस्तारीकरण झाले. भूसंपादनचा प्रश्न न्यायलयात गेल्याने स्टेबलिंग लाईनचा सुरुवात झाली नाही. मात्र या दरम्यान प्रशासनाने हडपसर ते हैदराबाद गाडी धावण्यास सुरुवात झाली. डेक्कन क्वीनचा नवीन रेक मुंबईत दाखल झाला. एसटीचा ५० दिवसांपेक्षा जास्त काळ संप चालला आहे. हा एसटीच्या ऐतिहासिक संप ठरला आहे.