यंदाच्या पिफमध्ये ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागच रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:06 AM2019-01-08T01:06:02+5:302019-01-08T01:06:31+5:30

नम्रता फडणीस पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी ‘मराठी सिनेमा टुडे’ विभाग असतो.यंदाच्या महोत्सवात रसिक या चित्रपटांना मुकणार ...

This year, the 'Marathi Cinema Today' section was canceled | यंदाच्या पिफमध्ये ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागच रद्द

यंदाच्या पिफमध्ये ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागच रद्द

Next

नम्रता फडणीस

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी ‘मराठी सिनेमा टुडे’ विभाग असतो.यंदाच्या महोत्सवात रसिक या चित्रपटांना मुकणार आहेत. या विभागामध्ये अप्रदर्शित चित्रपट दाखविण्यासाठी निर्मात्यांकडे सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राच्या अभावी चित्रपट घेत नाहीत. या विभागासाठी अटीएकही चित्रपट उपलब्ध न झाल्यामुळे ‘मराठी सिनेमा टुडे’ हा विभागच रदद करावा लागला असल्याचे आयोजकांकडून सांगितले आहे. तर दुसरीकडे महोत्सवात स्पर्धेव्यतिरिक्त चित्रपट प्रदर्शित करण्यास निर्मातेच अनुत्सुक असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.

मराठी चित्रपट स्पर्धेव्यतिरिक्त ज्या निर्मात्यांना महोत्सवात ‘प्रिमिअर’ करायची इच्छा आहे. त्यांना ‘मराठी सिनेमा टुडे’ या विभागातंर्गत अप्रदर्शित चित्रपट दाखविण्याचे व्यासपीठ खुले केले आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच माध्यमांशी संवाद साधण्याची संधीही निर्माता, दिग्दर्शकांना दिली जाते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच माध्यमांकडून प्रसिद्धी मिळाल्याने चित्रपटाची चर्चा होते. आजवर महोत्सवात प्रथमच सादरीकरण झालेल्या ’ख्वाडा’,‘अस्तु’, ‘हलाल’, ‘कोर्ट’ सारखे अनेक मराठी चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले असून, महोत्सवामुळे या चित्रपटांचा सर्वत्र बोलबाला झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. त्यामुळे महोत्सवामध्ये मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी निर्मात्यांकडून आवर्जून प्राधान्य दिले जाते. यंदाच्या वर्षी मात्र मराठी स्पर्धात्मक विभागात निवड केलेले सात चित्रपट सोडले तर एकाही चित्रपटाचा ‘प्रिमिअर’ पिफमध्ये पाहायला मिळणार नाही. यंदा चित्रपटच उपलब्ध न झाल्यामुळे ‘मराठी सिनेमा टुडे’ हा विभाग रदद केला असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

नियम व अटी पाळायला हव्यात
पटेल म्हणाले, पिफमध्ये मराठी चित्रपट स्पर्धेकरिता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत सेन्सॉर झालेले प्रदर्शित आणि अप्रदर्शित चित्रपट पाठविण्याचा नियम आहे. उदा:स्पर्धेसाठी 52 मराठी चित्रपट आले तर त्यातील सात चित्रपटांची निवड केली जाते. त्यानंतर निर्मात्यांना स्पर्धेव्यतिरिक्त चित्रपट दाखवायचे आहेत का? अशी विचारणा होते. चित्रपट दाखवायचा किंवा नाही हे त्यांच्या मर्जीवर असते. त्यांनी सहमती दर्शविल्यानंतर ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागांतर्गत त्यांचे चित्रपट दाखविले जातात.
४या विभागात चित्रपट दाखवायचा असेल तर तो चित्रपट अप्रदर्शितच असावा आणि तो सेन्सॉर झालेला असावा असा नियम आहे. परंतु निर्माते नियम वगैरे वाचत नाहीत आणि वेगळाच आग्रह धरतात. ब-याचशा निर्मात्यांकडे सेन्सॉर मंडळाचे प्रमाणपत्रच नसते. असे चित्रपट ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागामध्ये घेता येत नाहीत, असे पटेल म्हणाले.
 

Web Title: This year, the 'Marathi Cinema Today' section was canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे