यंदा ५ हजार हेक्टरवर भात

By admin | Published: July 25, 2016 02:10 AM2016-07-25T02:10:58+5:302016-07-25T02:10:58+5:30

वेल्हे तालुक्याला तांदळाचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यात ७५ टक्के भातलावणी झाली आहे, तर तालुक्यात एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी होणार असल्याचा अंदाज आहे

This year rice is 5 thousand hectare | यंदा ५ हजार हेक्टरवर भात

यंदा ५ हजार हेक्टरवर भात

Next

मार्गासनी : वेल्हे तालुक्याला तांदळाचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यात ७५ टक्के भातलावणी झाली आहे, तर तालुक्यात एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी होणार असल्याचा अंदाज आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली.
याबाबत सोनवणे म्हणाले की, मागील वर्षी एकूण ४९०० हेक्टरवर भातलावणी करण्यात आली होती; परंतु यावर्षी एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी करण्यात येईल, तर तालुक्यात भातलावणीचे एकूण क्षेत्र ७४०० असून, यापैकी ७५ ते ८० टक्के क्षेत्रावर भातलावणी करण्यात येते.
वेल्हे तालुक्यातील इंद्रायणी जातीच्या तांदळाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथील शेतकरी ९८ टक्के इंद्रायणी भाताची लागवड करतात, तर फुले समृद्धी व रत्नागिरी २४ काही प्रमाणात भातलागवड केली जाते, तर यावर्षी कृषी विभागाकडून १२५ हेक्टरवर ५ प्रकल्पांमध्ये फुले समृद्धीची बियाणे व जैविक कीटकनाशके व तणनाशके मोफत देण्यात आली आहे.
यावर्षी कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी कोकणाच्या धर्तीवर बांधावर तूरलागवड हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित विपुला जातीची
तूर शेतकऱ्याला हेक्टरी एक किलो दिली, तर मागील वर्षी
जिल्ह्यात फुले समृद्धी या भात पिकाचा उत्पादन स्पर्धेत तालुक्यातील अनुक्रमे पहिला व दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मिळाले. त्याचप्रमाणे याही वर्षी तालुक्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: This year rice is 5 thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.