यंदा भाताचे प्रतिहेक्टर २८ क्विंटल उत्पादन

By admin | Published: September 3, 2016 03:10 AM2016-09-03T03:10:52+5:302016-09-03T03:10:52+5:30

भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२,९५३ हेक्टर भातक्षेत्रापैकी ५७,६०२ हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. लागवडींना काहीसा उशीर

This year, rice quota yields 28 quintals | यंदा भाताचे प्रतिहेक्टर २८ क्विंटल उत्पादन

यंदा भाताचे प्रतिहेक्टर २८ क्विंटल उत्पादन

Next

पुणे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२,९५३ हेक्टर भातक्षेत्रापैकी ५७,६०२ हेक्टर क्षेत्रावर यंदा भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. लागवडींना काहीसा उशीर झाला असला, तरी ७९ टक्के भातक्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. खरिपातील प्रमुख पीक असून जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ व मुळशी या तालुक्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने यंदा सरासरी उतारा चांगला मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम भागात राहणाऱ्या भातउत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अबलंबून आसणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या भागात आसणारे भातउत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका भातशेतीला बसू लागला आहे.
यंदाच्या हंगामात पावसाने काहीशी उशिराने सुरुवात केली. यामुळे भातलागवडीची कामे लांबली. लागवडीनंतर पावसाने जोरदार सुरुवात केल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यात लागवड केलेली भातपिके सडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते; मात्र १५ आॅगस्टनंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतल्याने हा वातावरणातील बदल भातशेतीला पूरक ठरू पाहत आहे. पावसाने लागवडीनंतर शेवटपर्यंत शेतकऱ्यांना साथ दिल्यास काहीशा उशिराने लागवडी झाल्या असल्या, तरी यंदाच्या हंगामात बागायती भागात भाताचे उत्पादन चांगले मिळेल अशी शक्यता आहे. (वार्ताहर)

जुलैच्या महिन्यात भातलागवडी झालेले भात पोटरी व निसवण्याच्या अवस्थेत आहे. उशिराने लागवड झालेले फुटव्याच्या अवस्थेत आहे. बागायती भागात प्रतिहेक्टरी २८ क्विंटल, तर जिरायती भागात २२ क्विंटल याप्रमाणे उत्पादकता राहणार आहे.
- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

या भागामध्ये आंबेमोहर, इंद्रायणी, जीर, रायभोग, बासमती या सारख्या अस्सल पारंपरिक जातीच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. यंदा प्रत्येक तालुक्याची एकूण आकडेवारी वाढलेली असून, मावळ आणि खेड तालुक्यात उपलब्ध आसणाऱ्या एकूण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर भातलागवडी झाल्याचे चित्र आहे.

तालुकासरासरी क्षेत्रलागवड क्षेत्रटक्के
जुन्नर१२८५८१२०२०९३.५
आंबेगाव५७३०४९५०८६.४
खेड६९६३.८७१२०१०२
हवेली३४७३१८१८५२.३
मुळशी१४२०९८३८५५९
भोर८५४५६८४०८०
मावळ१०१४९१०८७११०७.१
वेल्हे९२९७.६४९१५५२.९
पुरंदर१७२७.२६८३३९.५९

Web Title: This year, rice quota yields 28 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.