मराठी नाटकांचे यंदा बेळगावात बीजारोपण
By admin | Published: November 25, 2014 12:01 AM2014-11-25T00:01:53+5:302014-11-25T00:01:53+5:30
यंदा बेळगाव येथे होत असलेल्या नाटय़ संमेलनानिमित्त मराठी नाटकांची परंपरा रुजविण्याकरिता बेळगाव नाटय़ परिषदेने पुढाकार घेतला आहे.
Next
पुणो : यंदा बेळगाव येथे होत असलेल्या नाटय़ संमेलनानिमित्त मराठी नाटकांची परंपरा रुजविण्याकरिता बेळगाव नाटय़ परिषदेने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील मराठी विद्याथ्र्याच्या नाटय़विषयक कार्यशाळा घेण्याबरोबरच एकांकिका स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेमधील विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण हे संमेलनाचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरणार आहे.
कर्नाटकात वीस वर्षामध्ये मराठी नाटकांचा पडदा उघडलेला नाही. त्यामुळेच तिथे अद्याप नाटय़चळवळीचे बीज रुजलेले नाही. मराठी भाषिक महाविद्यालयांमध्ये पथनाटय़ाचे सादरीकरण होते. मात्र, तेही हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये. ही सर्व पाश्र्वभूमी असताना यंदाचे 95वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन बेळगावामध्ये होत आहे, ही तेथील मराठी भाषकांसाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
संमेलन कोठे होत आहे, हा महत्त्वाचा मुद्दा नाही, हे यापूर्वीच आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तरीही संमेलनाच्या निमित्ताने विविध वाद उकरून काढीत राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
‘लोकमत’शी बोलताना वीणा लोकूर म्हणाल्या, ‘‘मुंबई, पुणोसारख्या महाविद्यालयांमध्ये ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’सारख्या एकांकिका स्पर्धा घेण्यात येतात. मात्र, अशा प्रकारच्या स्पर्धा बेळगावसारख्या प्रांतात पाहायला मिळत नाही. संमेलनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्याथ्र्याच्या कार्यशाळा घेऊन त्यांच्यासाठी एकांकिका स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगावमध्ये संमेलन होत असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पडद्यावरील
अभिनेते प्रत्यक्षात पाहायला
मिळणार असल्याची ‘क्रेझ’ त्यांच्यात आहे.
तुम्हीही संमेलनात सहभागी व्हा आणि त्याचा एक भाग होण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन
तरुणांना करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
मराठी नाटकांची परंपरा तेथे रूजू शकलेली नाही. म्हणूनच याभागातील 18 ते 2क् महाविद्यालयांमधील मराठी तरूणांसाठी नाटय़विषयक कार्यशाळा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
- वीणा लोकूर,
नाटय़ परिषद, बेळगाव