यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 11:41 AM2020-09-03T11:41:41+5:302020-09-03T11:43:13+5:30
लक्ष्मी रस्त्यावरील रूग्ण, नागरिकांसाठी यंदाचा विसर्जन सोहळा ठरला सुखकारक
पुणे : यंदा कोरोनामुळे गणराच्या विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्याने आवाजाची पातळी दरवर्षीपेक्षा ३० डेसिबल कमी नोंदवली गेली. साधारण दरवर्षी ९० डेसिबलची नोंद होते. मात्र यंदा सरासरी ६० डेसिबलची नोंद झाली. लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांसाठी हा सोहळा सुखकारक झाल्याचे दिसून आले. आवाजाचे प्रदूषण झाले नसल्याने लक्ष्मी रोडवरील नागरिक, रूग्ण यांना दिलासा मिळाला.
शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. महेश शिंदीकर आणि त्यांचे विद्यार्थी पद्मेश कुलकर्णी, विनित पवार यांनी या आवाजाची नोंद केली. ते २००१ पासून हा उपक्रम राबवतात.
मध्य भागातील प्रमुख नऊ रस्त्यांवर निरीक्षण करण्यात आले. यात बेलबाग चौक, कुंठे चौक, गणपती चौक, लिंबराज चौक, उंबर्या गणपती चौक, गोखले रस्ता, होळकर रस्ता, टिळक रस्ता, खंडोजीबाबा चौक या ठिकाणी आवाजाची पातळी नोंदवली गेली.
विसर्जन मिरवणुकीच्या आवाजाबाबत दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी नोंद करीत असतात. २००१ पासून डॉ. महेश शिंदीकर हा उपक्रम राबवित आहेत.
या उपक्रमासाठी नागेश पवार, शुभम अत्रे, रूद्रेश हेगू, बालाजी नावंदे, भागवत बिरादार यांनी सहकार्य केले.
नियमानूसार ध्वनी पातळीची मर्यादा (डेसिबल)
विभाग दिवसा रात्री
औद्योगिक क्षेत्र ७५ ७०
व्यावसायिकक्षेत्र ६५ ५५
निवासी क्षेत्र ५५ ४५
शांतता क्षेत्र ५० ४०
================
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने
२० वर्षात विसर्जन मिरवणुकीतील नोंद
वर्ष सरासरी (डेसिबल)
२००१ ९०.७
२००२ ९०.९
२००३ ९१.५
२००४ ९२.८
२००५ ९४.१
२००६ ९६.२
२००७ १०२.६
२००८ १०१.४
२००९ ७९.१४
२०१० १००.९
२०११ ८७.४
२०१२ १०४.२
२०१३ ११४.४
२०१४ ९६.३
२०१५ ९६.६
२०१६ ९२.६
२०१७ ९०.९
२०१८ ९०.४
२०१९ ८६.२
२०२० ५९.८
==========================
यंदाचा विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला सुखकर्ता
१ सप्टेंबर २०२० शहरातील मध्य भागातील आवाज पातळीची नोंद (डेसिबलमध्ये) सकाळी १२ वा. - ६९.५ दुपारी ४ वा. - ६८ रात्री ८ वा. - ६४.४ रात्री १२ वा. ५०.४१