यंदाचा गणेशोत्सवही निर्माल्यातून निसर्गाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:34+5:302021-09-22T04:12:34+5:30

पुणे : ‘निर्माल्य टू निसर्ग’ या पुणे महापालिका, स्वच्छ पुणे व कमिन्स इंडिया यांच्या एकत्रित उपक्रमादरम्यान १०७ टन निर्माल्य ...

This year's Ganeshotsav is also from Nirmala to nature | यंदाचा गणेशोत्सवही निर्माल्यातून निसर्गाकडे

यंदाचा गणेशोत्सवही निर्माल्यातून निसर्गाकडे

Next

पुणे : ‘निर्माल्य टू निसर्ग’ या पुणे महापालिका, स्वच्छ पुणे व कमिन्स इंडिया यांच्या एकत्रित उपक्रमादरम्यान १०७ टन निर्माल्य यंदाच्या गणेशोत्सवात संकलित केले. पुण्याच्या संस्कृतीसोबत निसर्गही जपून पुणेकरांनी या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला. हे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठवून ते शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.

पुण्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य शहराच्या नदीपात्रात किंवा इतर कचऱ्यामध्ये पडू न देता ते वेगळे गोळा करण्याची व्यवस्था स्वच्छच्या कचरावेचकांनी पुणे महापालिकेच्या साथीने शहरात मागील ११ वर्षांपासून रुजवली आहे. नागरिकांच्या श्रद्धेला तडा जाऊ न देता शहराचे पर्यावरण जपण्याच्या या अनोख्या उपक्रमामध्ये या वर्षीही कचरावेचकांना मोठे यश मिळाले. कोविडकाळाची विशेष गरज जाणत दारोदारी निर्माल्य गोळा करून स्वच्छच्या कचरावेचकांनी नागरिकांप्रती आपली बांधिलकी जपली.

“नैसर्गिकरित्या सहज जिरवल्या जाऊ शकणाऱ्या निर्माल्याचे इतर कचऱ्यापासून वर्गीकरण प्राथमिक स्तरावर होणे आवश्यक असते. यावर्षी नागरिकांनी आपले निर्माल्य वेगळे ठेवून १२, १५ आणि २० सप्टेंबर रोजी झालेल्या ‘निर्माल्य टू निसर्ग’च्या संकलन मोहिमांमध्ये ते स्वच्छच्या कचरावेचकांना वेगळे दिले. कचरावेचकांनी नागरिकांना लावलेल्या या छोट्या पण महत्त्वाच्या सवयीमुळे आज शहर स्तरावर निर्माल्य नैसर्गिकरित्या सहज जिरवले जाऊ शकत आहे. पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून निसर्ग आणि उत्सव याची सांगड घालणारे शहर अशी पुण्याची ओळख निर्माण झाली आहे.”, असे स्वच्छ संस्थेचे ऑपरेशन्स हेड आलोक गोगटे म्हणाले.

————————-

मागच्या वर्षीपासून आम्ही निर्माल्य प्रत्येक घरातून गोळा करत आहोत. नागरिकांचादेखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. निर्माल्य नदीपात्रात किंवा कुठे उघड्यावर न टाकण्याच्या आमच्या आवाहनाला नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. प्रत्येक उपक्रमातून नागरिकांसोबत असलेले आमचे नाते जपत पुण्याचे कचरा व्यवस्थापन बळकट करणे हेच आमचे ध्येय आहे.

- विद्या नाईकनवरे, कचरावेचक प्रतिनिधी, धनकवडी, स्वच्छ

Web Title: This year's Ganeshotsav is also from Nirmala to nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.