यंदाचा गोवा लघुपट महोत्सव पुण्यात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:52+5:302020-12-11T04:27:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दरवर्षी गोव्यामध्ये होणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुण्यामध्ये दि. १२ आणि ...

This year's Goa Short Film Festival will be held in Pune | यंदाचा गोवा लघुपट महोत्सव पुण्यात होणार

यंदाचा गोवा लघुपट महोत्सव पुण्यात होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दरवर्षी गोव्यामध्ये होणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुण्यामध्ये दि. १२ आणि १३ डिसेंबर रोजी आयोजित करणार आहे. गोवा लघुपट महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.

नवी पेठेतील एस. एम जोशी सभागृह येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा महोत्सव गोव्यातील पणजी येथे होत आहे. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गोव्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठया प्रमाणावर बंधने आहेत, त्यामुळे हा महोत्सव पुण्यामध्ये भरविणार आहे. महोत्सवासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे, अशी माहिती संयोजक मराठी चित्रपट परिवारचे अनुप जोशी यांनी दिली.

दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत महोत्सवात भारतासह देश विदेशातील शंभरहून अधिक लघुपट दाखविणार आहे. रविवारी (दि.१३) रात्री ८ वाजता महोत्सवाचे पारितोषिक वितरण होणार आहे. ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे, ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करणार आहे. विविध विभागातील १८ पारितोषिके प्रदान करणार आहेत.

Web Title: This year's Goa Short Film Festival will be held in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.