यंदाची गुढी साधेपणाने साजरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:03+5:302021-04-14T04:11:03+5:30
पुणे : यंदाचा गुढीपाडवादेखील कोरोनामुळे सुनासुनाच गेला आहे. वीकेंड लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे या पाडव्याला मोठी उलाढाल ...
पुणे : यंदाचा गुढीपाडवादेखील कोरोनामुळे सुनासुनाच गेला आहे. वीकेंड लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे या पाडव्याला मोठी उलाढाल झालीच नाही. लवकरच संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याने बाजारपेठा बंदच राहण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.
नवीन वर्षात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असून, कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये धास्ती तर आहेच, पण बाजारपेठांमध्येही नैराश्य पसरले आहे. यंदा तर गुढीपाडव्याला नागरिकांना काहीच खरेदी करता आले नाही. गुढीपाडवा म्हटलं की, नवीन खरेदी केली जाते. नवीन गाडी, सोने, कपडे, घर खरेदीसाठी मोठी गर्दी असते. पण यंदा काहीच झाले नाही. परिणामी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. गुढीवर लावण्यासाठी साखरहार ठिकठिकाणी दिसून येत असतात. पण यंदा अनेकांना हे साखरहार मिळालेच नाहीत. कारण त्याचे उत्पादनच कमी होते. अनेक दुकानांमध्ये साखरहार विक्रीला आले नसल्याचे दिसून आले. तसेच फुलांचा व्यवसायही कमी झाला. दरवर्षी रस्त्यालगत फुलांचे ढीग असतात. वाहनांना फुलांचे हार घातले जातात. पण यंदा कुठेही फुलांचे ढीग दिसून आले नाहीत. एकूणच सर्व व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
--------------