ज्येष्ठ उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांना यंदाचा 'पुण्यभूषण' पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:44 PM2021-03-23T14:44:40+5:302021-03-23T14:47:20+5:30
पुरस्काराचे यंदा 32 वे वर्ष आहे.
पुणेः उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणाऱ्या बाबासाहेब नीळकंठ कल्याणी यांना यंदाच्या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कल्याणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. कोविड-19 चे संकट कमी झाल्यानंतर हा पुरस्कार सोहळा होणार आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढतांना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे त्रिदल पुुणे पुण्ययभूषण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसई यांनी मंगळवारी(दि.२३) जाहीर केले.
पुण्यभूषण पुरस्कारासाठी २०२० मध्येच ही निवड करण्यात आली होती. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही. पुरस्काराचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह आणि रूपये १ लाख रुपये रोख असे आहे.
बाबा नीळकंठ कल्याणी हे एकूण 3.0 बिलीयन डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
यावेळी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ 2021 आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर लढताना जखमी होऊन अपंग झालेल्या जवानांचा गौरव होणार आहे.
यात नाईक - धरमवीर सिंग, नाईक - सुरेश कुमार कर्की, शिपाई - के. नागी रेड्डी, श्रीमती हौसाबाई पाटील (सातारा) आणि माधवराव माने (सांगली) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.