यंदा होणार पाण्याची पळवा पळवी !

By admin | Published: April 4, 2015 11:08 PM2015-04-04T23:08:39+5:302015-04-04T23:08:39+5:30

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आजमितीस या प्रकल्पात केवळ २५ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

This year's runaway run! | यंदा होणार पाण्याची पळवा पळवी !

यंदा होणार पाण्याची पळवा पळवी !

Next

डिंभे : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आजमितीस या प्रकल्पात केवळ २५ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
आजच्या तारखेस प्रकल्पात ७.६ टीएमसी २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या प्रकल्पात १२ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. शिल्लक पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर न झाल्यास यंदा उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करणार असून, वाढती पाण्याची मागणी व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता कुकडी प्रकल्पातील पाण्याची पळवापळवी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याच्या ओढा-ताणीमुळे धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येणार आहे. धरणाच्या आतील गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा
लागणार आहे. (वार्ताहर)

४पिंपळगाव जोगा : कुकडी प्रकल्पात येणारे हे धरण सन २००० मध्ये पूर्ण झाले असले, तरी १९९६-९९ पासूनच घळभरणी पूर्ण करून धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात केली आहे. या धरणाची लांबी १५६० मीटर असून, या धरणास पाच वक्र दरवाजे आहेत. या धरणातून ७० किमीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६८७ टीएमसी एवढी असून, आजतागायत या धरणात १६ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

४मागील वर्षाची तुलना करता यंदाच्या उन्हाळ्यात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणाीसाठ्यात घट झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदा या प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या धरणांतून रब्बीसाठी १ खरिपासाठी १ एक अशी दोन रोटेशन पूर्ण झाली आहेत. यामुळे आज जरी कुकडी प्रकल्पात २५ टक्के एवढा पाणीसाठा दिसत असला, तरी वाढती उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे यंदा या प्रकल्पातील धरणे कोरडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिंभे धरणासह यंदा प्रकल्पातील सर्वच धरणांत जेमतेम पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या आतील आदिवासी गावांना पाण्याच्या या पळवापळवीचा फटका बसणार असून, या भागात असणाऱ्या पाणी योजना अडचणीत येणार असल्याने धरणपाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.

४येडगाव : कुकडी प्रकल्पात येणारे येडगाव धरण हे महत्त्वाचे धरण असून, या धरणाचे बांधकाम सन १९७७ ला पूर्ण झाले. धरणाची लांबी ४३१० मीटर असून, उंची २३.६० मीटर आहे. हे धरण पिकअपविअर म्हणून बांधण्यात आले असून डिंभे,माणिकडोह,पिंपळगाव व वडज या धरणांतून या धरणात पाणी सोडण्यात येते. या धरणास २४९ किमी लांबीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात २९ टक्के एवढा पाणीसाठा आहे.
४माणिकडोह : माणिकडोह या धरणात सन १९८५ पासून पाणी साठवण्यास सुरुवात केली आहे. या धरणाची लांबी ९३० मीटर असून, उंची ५१.८० मीटर आहे. या धरणास २३.५० किमीचा कालवा असून, धरणाची एकूण साठवण क्षमता १०.८८ टीएमसी एवढी आहे. सध्या या धरणात ८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
४वडज : प्रकल्पातील हे धरण मीना नदीवर बांधण्यात आले असून, १९८३ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर एवढी आहे. धरणास १४ किमीचा मीना पूरक कालवा व ४० किमीचा मीना शाखा कालवा काढण्यात
आला आहे.

Web Title: This year's runaway run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.