येलघोल लेणी दीपोत्सवाने उजळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:41+5:302021-03-06T04:09:41+5:30
पुणे : मावळ तालुक्यातील येलघोल बुद्ध लेणी येथे माघ पौर्णिमेच्या निमित्ताने मावळ लेणी संवर्धकांनी स्वच्छता करून दोनशे दीप प्रज्वलीत ...
पुणे : मावळ तालुक्यातील येलघोल बुद्ध लेणी येथे माघ पौर्णिमेच्या निमित्ताने मावळ लेणी संवर्धकांनी स्वच्छता करून दोनशे दीप प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा केला.
पिंपरी-चिंचवड येथील लेणी संवर्धक प्रशांत आगळे, रामचंद्र अचलकर व समाधान सोनवणे तसेच स्थानिक लेणी संवर्धक यांनी येलघोल बुद्ध लेणी मावळ येथे भेट दिली. लेणीचा परिसर स्वच्छ करून तेथील कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली. स्तुपासमोर फुलांनी सजावट करून धूप व २०० दीप प्रज्वलित केले. दीपोत्सव व पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेली लेणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. दीपोत्सव करून सामूहिक बुद्धवंदना घेतली.
ही लेणी निसर्गरम्य ठिकाणी असून लेणीमध्ये स्तूप आहे. या लेणीमध्ये एक पाण्याची पोडी आहे. ही लेणी बेडसे लेणीच्या समकालीन असण्याची शक्यता आहे. अचलकर यांनी माघ पौर्णिमेचे महत्त्व सांगून प्राचीन बुद्ध विचारांनी प्रगल्भ असलेल्या या लेण्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच पुरातत्त्व खात्याने या लेण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व लेणी संवर्धकांनी प्रत्येक रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला बुद्ध लेण्यांमध्ये येण्याचा संकल्प केला.