येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 07:38 PM2019-06-03T19:38:32+5:302019-06-03T19:39:41+5:30

जेजुरी गडावर वर्षातून अनेकदा जत्रा भरली जाते, त्यातच सोमवती आमवस्यालाही गडावर जत्रा भरते.

Yelkot Yelkot ghe ... devotee came from across maharashtra for darshan of god khanderaya | येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली

येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली

googlenewsNext

पुणे - महाराष्ट्रातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज भक्तांची मोठी गर्दी जमली होती. सोमवती आमवस्या असल्याने सकाळपासूनच भक्तगण खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर आगमन करत होते. सोमवती आमवस्या असल्याने येथे जत्राही भरली जाते. राज्याच्या काना-कोपऱ्यातून भाविक उन्हाच्या कडक तडाख्यातही दर्शनला रांग लावत होते.    
जेजुरी गडावर वर्षातून अनेकदा जत्रा भरली जाते, त्यातच सोमवती आमवस्यालाही गडावर जत्रा भरते. या यात्रेला राज्यातून भक्तगण हजेरी लावतात. तर, लगीनसराईचा हंगाम असल्याने नवजोडपेही जेजुरीला येऊन खंडेराय आणि बानूदेवीचे दर्शन घेतात. लग्नानंतरच्या देवदेवाची पारंपारिक प्रथा जोपसण्यासाठी नव-दाम्पत्य जेजुरी गडावर दर्शनासाठी येते. आज सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते. 

पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुक्तपणे भंडारा आणि खोबरं उधळून भाविकभक्त मनमुरादपणे जेजुरी दर्शनाचा आनंद घेतात. खंडेरायाची जेजुरी पिवळीधमक झाली आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची हवी तशी सोय नसल्याने विकतचे पाणीच भक्तांना प्यावे लागत आहे. तर, भाविकांच्या भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा तेथील काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. 


 

Web Title: Yelkot Yelkot ghe ... devotee came from across maharashtra for darshan of god khanderaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.