Heavy Rain Pune: पुण्यात येलो अलर्ट; शहरात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:10 AM2023-05-04T10:10:40+5:302023-05-04T10:11:16+5:30

पुण्यात पुढील ४ दिवस पाऊस तर ७ मेनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता

Yellow alert in Pune Chance of rain with thunder in the city for the next 4 days | Heavy Rain Pune: पुण्यात येलो अलर्ट; शहरात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Heavy Rain Pune: पुण्यात येलो अलर्ट; शहरात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

googlenewsNext

पुणे: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण राज्यावर झाला असून पुण्यासह अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुण्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ राहील तसेच विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

काल सकाळपासून आकाश निरभ्र होते. आर्द्रता असल्याने उकाडा वाढला होता. दुपारनंतर आकाशात अचानक ढगांनी गर्दी करण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ५ नंतर शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाला सुरुवात झाली. शहराच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. कोथरुड, शिवाजीनगर भागात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. कार्यालयातून तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. पौड रस्त्यावरील कचरा डेपो परिसरात पावसाच्या पाण्यामुळे काही दुचाकी घसरून पडल्या. वारजे परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. बावधन परिसरात हलकी सर येऊन गेली. सहकारनगरला रिमझिम पाऊस पडला. लोहगाव, मगरपट्टा, वडगाव शेरी परिसरात पावसाने जाेरदार हजेरी लावली. लोहगावात हलक्या सरी आल्या.

पश्चिम विदर्भापासून ते दक्षिण कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती आणि वाऱ्याची खंडितता निर्माण झाली असून ती मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकमधून जात आहे. परिणामी, संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची स्थिती आहे. पुणे परिसरात पुढील ७ मेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आकाश सकाळी निरभ्र राहून दुपारनंतर ढगाळ होईल. त्यानंतर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ७ मेनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

रात्री साडेआठपर्यंत पडलेला पाऊस (मि. मी.)

शिवाजीनगर - ४.५
लोणावळा - ६
कोरेगाव पार्क - ४
भोर - ०५
मगरपट्टा - ४
वडगाव शेरी - ३

Web Title: Yellow alert in Pune Chance of rain with thunder in the city for the next 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.