ससूनमध्ये मिळणार यलो फि व्हरची लस
By admin | Published: January 5, 2015 11:04 PM2015-01-05T23:04:43+5:302015-01-05T23:04:43+5:30
दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमध्ये जाताना प्रवाशाला यलो फिव्हरची लस घेणे अनिवार्य आहे.
पुणे : दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांमध्ये जाताना प्रवाशाला यलो फिव्हरची लस घेणे अनिवार्य आहे. आता ही लस आणि त्याचे प्रमाणपत्र ससून रुग्णालयात मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही लस देणारे ससून हे महाराष्ट्रातील पहिले राज्य सरकारी रुग्णालय ठरले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये यलो फिव्हरचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळतात. याचे इतर देशातून आणखी रुग्ण येऊ नयेत म्हणून या देशांनी नियम बनविले असून प्रत्येक प्रवाशाला हे लसीकरण केलेले प्रमाणपत्र घेऊन जाणे बंधनकारक आहे. सध्या पुणे शहरात
केवळ विमानतळावरच ही लस उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयातही ही लस दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी धावपळ होत होती. ससून रुग्णालयात या लसीबाबत दररोज विचारणाही होत होती. त्यामुळे ससून प्रशासनाने या लसीचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या लसीकरण केंद्राचे उद्घाटन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ससूनचे उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. विद्या केळकर, डॉ. विनय टापरे, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. संगीता शेळके, डॉ. प्राची सौंदणकर आदी उपस्थित होते.
कोल्हापूर येथील विनयकुमार नागवे यांना पहिली लस
देण्यात आली. दिवसभरात २२
जणांना ही लस देण्यात आली.
ही लस घेण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
एमआरआय थ्री टेस्टला मशीन नाही
४छोटयात छोटया रोगाचे, अपघात झाल्यानंतर मेंदू, हाडांमधील अचूक रक्तस्त्रावाचे अचूक निदान करण्यासाठी आवश्यक असलेले एमआरआय थ्री टेस्टला मशीन ससून रुग्णालयात नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. ज्या रुग्णांना या तपासणीची गरज आहे त्यांना अनेकदा बाहेरून ही तपासणी करून घ्यावी लागत आहे.
४रुग्णालयाला हवा तेवढा निधीच मिळत नसल्यामुळे अनेक जुनी मशीन वापरली जात आहेत. यातील अनेक मशीनचे आयुष्यही संपले आहे. मात्र नव्या मशीन्स नसल्याने त्या वापरल्या जात आहेत. अत्याधुनिक मशीन उपलब्ध असतानाही त्या ससूनमध्ये नसल्याने रुग्णांच्या रोगाचे अचूक निदान करण्यात अडचणी येतात.