येलवडीत घाणीचे साम्राज्यच प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:18+5:302020-12-22T04:11:18+5:30
गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून वाहत आहे. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक ...
गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून वाहत आहे. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत, गटारी तुटलेल्या अवस्थेत आहेत मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायत डोळे असून दुर्लक्ष करत आहे. या गटारीच्या वाहत्या पाण्यावरून अनेक वाहने ये - जा करतात पादचारी नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. काही वेळेस चुकून जर कुणाच्या अंगावर हे घाण पाणी उडाल्यास मोठा वादविवाद निर्माण ठरलेलाच असतो.
काही ठिकाणी गटारीची नियमित साफसफाई होते , तर काही ठिकाणी एक ते दिड महिन्यांनी सफाई होते , त्यामुळे त्या परिसरात डासाचा प्रादुर्भाव वाढीस लागला असुन त्या परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. आधिच कोरोना व्हायरसच्या भितीने नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे , त्यात काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने साडपाण्याचे डबके साचले आहे . यातून दुर्गधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे . आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत गावात साफसफाई नियमित करणे गरजेचे आहे गटारी काढणे पिण्याच्या पाण्यात टि.सी.एल पावडर वापरणे काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज असेल ते दुरुस्त करणे व गावातील सर्वच भागात स्वच्छता अभियान राबवण्यासह गावात डासाचा नायनाट होईल अशी धुरळणी सह फवारणी करणे गरजेचे आह. सार्वजनिक शौच्छालय देखील साफसफाई करणे गरजेचे आहे मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत आहे त्यांची स्वच्छता करावी अशी अपेक्षा येलवाडीतील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
--
२१ महाळुंगे