येरवडा कारागृहाला मिळणार एेतिहासिक तटबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:06 PM2018-08-30T14:06:35+5:302018-08-30T14:09:16+5:30
येरवडा कारागृहाची सुरक्षा लक्षात घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या समाेर भिंत उभारण्यात येत अाहे.
पुणे : भारतातील महत्त्वाचे कारागृह असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहाला अाता एेतिहासिक तटबंदी करण्यात येणार अाहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील बाजूस एक भिंत उभारण्यात येत असून तिला एेतिहासिक लूक देण्यात येणार अाहे. अशी माहिती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी दिली.
अाशिया खंडातील सर्वात माेठे कारागृह अशी येरवाडा कारागृहाची अाेळख अाहे. अाजमितीला साडेपाच हजाराहून अधिक कैदी या कारागृहात शिक्षा भाेगत अाहेत. या कारागृहाची उभारणी इंग्रजांनी केली हाेती. या कारागृहाला माेठा एेतिहासिक वारसा सुद्धा अाहे. या कारागृहाची मुख्य इमारत ही एेतिहासिक इमारत म्हणून अाेळखली जाते. त्यामुळे या इमारतीला शाेभेल अशी भिंत उभारण्याचे काम सध्या सुरु करण्यात अाले अाहे. सध्या कारागृहाच्या मुख्य प्रवेसद्वारासमाेर पत्र्याचे कुंपन अाहे. येरवडा कारागृह हे एक संवेदनशील कारागृह असल्याने त्याची सुरक्षा महत्त्वाची अाहे. या कारागृहात सध्या गंभीर गुन्ह्यातील अाराेपी शिक्षा भाेगत अाहेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा लक्षात घेऊन दगडी सीमाभिंत उभारण्यात येत अाहे.
याविषयी माहिती देताना पवार म्हणाले, सध्या कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर पत्र्याचे कुंपन अाहे. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून दगडी भिंत उभारण्यात येत अाहे. 16 अाॅगस्ट पासून या कामाला सुरुवात झाली अाहे. कारागृहाची इमारत ही एेतिहासिक इमारत असल्याने त्यापद्धतीची भिंत उभारण्यात येत अाहे. कारागृहाच्या समाेरील रस्त्याच्या बाजूने ही भिंत उभारण्यात येणार अाहे. 6 फूट उंचीची ही इमारत असणार अाहे.