येरवड्यात टोळक्यांचा राडा, १४ वाहने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:23+5:302021-09-24T04:12:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने १२ ते १३ जणांच्या टोळक्याने तलवार, लोखंडी रॉड व कोयते ...

In Yerwada, 14 vehicles were blown up | येरवड्यात टोळक्यांचा राडा, १४ वाहने फोडली

येरवड्यात टोळक्यांचा राडा, १४ वाहने फोडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने १२ ते १३ जणांच्या टोळक्याने तलवार, लोखंडी रॉड व कोयते घेऊन येरवडा येथील प्रतिकनगर मधील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या १४ वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी अब्दुल सय्यद (वय ५१, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा समावेश आहे. या तोडफोडीत २ रिक्षा, मोटारी आणि १० दुचाकींचे नुकसान झाले आहे.

सय्यद व त्यांचे चुलत भाऊ नवाज सय्यद यांचे जनरल स्टोअर असून बुधवारी रात्री ते दुकानात बसले होते. त्यावेळी हे टोळके हातात तलवारी, लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन आले. त्यांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या टोळक्याने १० दुचाकी, २ मोटारी व रिक्षांचे नुकसान केले. तेथील दुकानदारांना दुकाने जबरदस्तीने बंद करायला भाग पडून आरडाओरडा करीत ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर येरवडा पोलीस घटनास्थळी पोहचले. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. खटके तपास करीत आहेत.

Web Title: In Yerwada, 14 vehicles were blown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.