येरवड्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:20 AM2018-08-23T01:20:50+5:302018-08-23T01:21:49+5:30

पर्णकुटी पायथ्याजवळ सयाजीनाथ महाराज विसर्जन घाटासमोर ही घटना घडली

Yerwada premeditated killing of two people; One died on the spot and another seriously injured | येरवड्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

येरवड्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Next

विमाननगर -पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून सशस्त्र हल्लेखोरांनी दोन तरुणांवर केलेल्या गंभीर हल्ल्यात येरवड्यात एकाचा खून झाला. निहाल जनार्दन लोंढे (वय१९ राहणार लक्ष्मीनगर येरवडा) याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र राहुल सतीश कांबळे (वय २३,राहणार लक्ष्मीनगर येरवडा )हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ सयाजीनाथ महाराज विसर्जन घाटासमोर ही घटना घडली. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ एका तरुणाला तलवारीने मारहाण करत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. घटनास्थळी येरवडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ गेले असता एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तेथे पडलेला दिसला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निहाल जनार्दन लोंढे असे त्याचे नाव असून तो त्याच्या मित्रांसमवेत पर्णकुटी पायथा येथून चालला असताना अज्ञात हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याने त्यांच्यावर वार केले.निहालच्या डोक्यावर तसेच कानावर वार करण्यात आले होते, तर त्याचा मित्र राहुल कांबळेच्या पोटावर व हातावर वार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू येरवडा  विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत .

Web Title: Yerwada premeditated killing of two people; One died on the spot and another seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.