होय, मी सावरकर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:20+5:302021-02-27T04:14:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यपंक्ती गात आणि ‘होय मी सावरकर’ अशा घोषणा देत चिमुकल्यांनी सावरकर यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशातील मुलांनी या वेळी सावरकरांचे काव्यरुपी चरित्र सादर केले.
साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने कर्वे रस्त्यावरील वीर सावरकर स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘होय मी सावरकर’ या उपक्रमाचे आयोजित करण्यात आला. यावेळी इतिहास संशोधक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक प्रा. सु. ह. जोशी, मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह, आश्विनी देशपांडे, वृषाली साठे, राधिका बविकर, प्रतिभा पवार, सारिका पाटणकर, विकास महामुनी, किरण सोनिवाल, नंदू ओव्हाळ, कल्पना ओव्हाळ आदी उपस्थित होते.
सु. ह. जोशी म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी २ वेळा म्हणजे ५० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रत्येक घरी सावरकरांचे विचार पोहोचले पाहिजेत.” स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विदेशी कपड्यांची होळी ज्या ठिकाणी केली, त्याच ठिकाणी ‘स्वदेशी’चे महत्त्व सांगून मुलांना सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती देण्यात आली.