"हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो" पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 08:31 PM2020-08-06T20:31:56+5:302020-08-06T20:34:22+5:30

कोरोनाच्या संकटात यावर्षी मंडप न टाकता गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना मंदिरामध्येच करावी : पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे

"Yes, I request to you," celebrate this year's Ganeshotsav simply | "हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो" पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

"हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो" पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेतर्फे गणेश मंडळांची आढावा बैठक

पुणे : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. शतकोनशतके चालत आलेली पंढरी वारी खंडीत करून, यावर्षी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका थेट पंढरपूरला नेण्यात आल्या. अशावेळी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील सांमजस्याची भूमिका घेऊन यंदाच्या वर्षी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मंडपात न करता आहे,त्या मंदिरातच करावी, असे आवाहन पुणेपोलिसांनी केले आहे. 

गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेतर्फे आयोजित गणेश मंडळांच्या आढावा बैठकीत पोलिस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच आदी पदाधिकारी व अधिकारी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी पोलिसांनी, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव नेहमीच्याच उत्साहात व परंपरेनुसार साजरा केला जाणार असला तरी, यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मंडळांना कोणत्याही प्रकारच्या देखाव्यांना परवानगी दिली जाणार नाही.दरम्यान, कोरोनाच्या संकटात गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून उत्सव साधेपणाने साजरा करावा व कोरोना पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या उभारणीस हातभार लावावा असे आवाहनही यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले.

पुणे शहरातील बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्ती या वर्षभर मंदिरामध्येच असतात. त्यामुळे कोरोना आपत्तीत यावर्षी गणेश मंडळांनी मंडप टाकण्याऐवजी मंदिरामध्येच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी व १० दिवसांनी तेथेच पुजेच्या मुर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन यावेळी डॉ. शिसवे यांनी केले. बहुतांशी मंडळांनी यास सकारात्मकता दाखविली असून, मानाच्या मंडळांनीही याकरिता पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. 

----------------------------------------------

कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढू नका - महापौर 

शहरात आपण दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करतो. मात्र यंदा आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहोत. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करूयात. गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. व भाविकांना डिजिटल पध्दतीच्या माध्यमातुन दर्शनाची व्यवस्था करावी. त्याच बरोबर गणेश मुर्तींचे विसर्जन मंडळांच्या जवळ व घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Web Title: "Yes, I request to you," celebrate this year's Ganeshotsav simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.