डाळिंब शेतीतून लाखोंचे उत्पन्न

By Admin | Published: October 2, 2015 01:01 AM2015-10-02T01:01:49+5:302015-10-02T01:01:49+5:30

अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात इस्राईल या प्रगत देशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पुणे विभागातील पहिलाच डाळिंब शेतीचा यशस्वी अभिनव प्रयोग शेतकरी अमित कुंजीर यांनी राबवला आहे

The yield of millions of pomegranate farming | डाळिंब शेतीतून लाखोंचे उत्पन्न

डाळिंब शेतीतून लाखोंचे उत्पन्न

googlenewsNext

संदीप नवले, पाटेठाण
अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात इस्राईल या प्रगत देशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पुणे विभागातील पहिलाच डाळिंब शेतीचा यशस्वी अभिनव प्रयोग शेतकरी अमित कुंजीर यांनी राबवला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी काळ्या मातीतून खरोखर सोने पिकवले असून, त्यातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
जिद्द, चिकाटी, सातत्य व प्रामाणिकपणे कष्टाला जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर कष्टाचे निश्चितच सोने होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दौंड तालुक्याच्या पश्चिमेला शेवटच्या टोकाला असलेल्या मिरवडी (ता. दौंड) या गावातील हे शेत आहे. संपूर्ण उत्पादित मालाची परदेशात विक्री केली जाते.
पुण्याजवळील चासकमान या ठिकाणी बांधकाम खात्यात नोकरीला असलेले अमित कुंजीर यांना उपजतच शेतीची आवड होती.
काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा त्याग करून शेतीची कास धरली. आणि १९९५ मध्ये एक एकर डाळिंब लागवड करून डाळिंब शेती करण्यास सुरुवात केली. शेतीमधील आधुनिकता पाहण्यासाठी इस्राईल, जपान, ब्राझील, आॅस्ट्रेलिया या देशांना भेटी देऊन माहिती मिळवली.
खुरपणीवर भर आणि विशेष म्हणजे एक एकराच्या झाडांचे लागवडीपासून छाटणीपर्यंतचे काम एक पुरुष व महिला करतात. साध्या झाडांना काठीचा आधार दिला जातो. परंतु या झाडांना जाळीचा आधार दिला आहे. त्यामुळे मजुरीत बचत होते. कोणतीही रासायनिक औषधं न वापरता सेंद्रिय शेतीवर आधारित लिंबाच्या झाडांच्या पाल्याचा रस, निरमा पावडर, लसूण बुकटी याचा वापर औषध फवारणी म्हणून केला जातो. झाडांना रोग जडू नये म्हणून ट्रायको, लसणाचे ड्रींचिंग करतात. विशेष म्हणजे दोन झाडांच्या मध्ये तुळशीची लागवड केली आहे.

Web Title: The yield of millions of pomegranate farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.