योगामुळे अंतर्मनात येतात सकारात्मक गोष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:40+5:302021-06-27T04:08:40+5:30
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत शांती या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन ...
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत शांती या विषयावर विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमात रामदेव बाबा बोलत होते. यावेळी एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव उपस्थित होते.
स्वामी रामदेव बाबा म्हणाले, देशातील सामाजिक आणि मानसिक समस्या सोडविण्यासाठी मोठ्या स्वरूपात कार्य होणे गरजेचे आहे. वैद्यकीय शास्त्र जे करू शकले नाही, ते योगाच्या माध्यमातून साध्य होताना दिसत आहे. यामुळे डायबेटिज सारख्या अनेक असाध्य रोगांना कायमस्वरूपी घालविले आहे. देशाला योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देताना समृध्दी आणता येईल.
विश्वनाथ कराड म्हणाले, योगाभ्यासाच्या माध्यातून चिंतन केले जाते. ज्ञान, कर्म आणि भक्ती योग या तिन्हींच्या माध्यमातून ईश्वर दर्शन घडते.
राहुल कराड म्हणाले, योग, अध्यात्म आणि ध्यान या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे काळाची गरज आहे. भारतीय संस्कृती, परंपरा संपूर्ण जगात पोहचविण्यासाठी एमआयटी कार्य करीत आहे.