कोरोनाबाधितांसाठी महापालिकेकडून योगा, प्राणायमाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:14+5:302021-05-05T04:20:14+5:30
पुणे : मन निरोगी असेल तर कोणत्याही आजारावर मात करता येते. त्यामुळे कोरोना कालावधीत सर्वांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे ...
पुणे : मन निरोगी असेल तर कोणत्याही आजारावर मात करता येते. त्यामुळे कोरोना कालावधीत सर्वांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता पुणे महापालिका व पतंजली योग समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने, शहरातील होम क्वारंटाइन, बरे झालेले कोरोनाबाधितांसह सर्वच पुणेकरांसाठी योगा, प्राणायाम मोफत शिकविले जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली़
या योग प्राणायम व आयुर्वेदिक तथा घरगुती औषधांचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण गुगल मिट आणि फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारपासून सुरू होणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पतंजली समितीचे बापू पडळकर उपस्थित होते़
प्रशिक्षणाचे उद्घाटन ऑनलाइन पध्दतीने बुधवारी सायंकाळी पाच वाजता योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रशिक्षणात पतंजली योगपीठाचे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक व आयुर्वेद तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण दिवसातून दोन वेळा होणार आहे. त्याची वेळ सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ५ ते ६ असणार आहे. तसेच संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळेत २५ योग व आयुर्वेद तज्ज्ञ फोनव्दारे नागरिकांच्या शंकांचे समाधान करणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमाची लिंक गुगल वर ेीी३.ॅङ्मङ्मॅ’ी.ूङ्मे/ू३०-ं६ू४-७ं१ तर फेसबुक वर ँ३३स्र२://६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ढटउढ४ल्ली या आयडीवर उपलब्ध आहे.