पेरिविंकल स्कूलमध्ये गिरवले योग प्राणायामाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:18+5:302021-06-22T04:08:18+5:30
पेरिविंकल स्कूलमध्ये योगशिबिराचे आयोजन हे पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल,संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले,रुचीरा खानविलकर, ...
पेरिविंकल स्कूलमध्ये योगशिबिराचे आयोजन हे पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल,संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले,रुचीरा खानविलकर, निर्मल पंडीत व योगप्रशिक्षक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
पिरंगुटमध्ये योग प्रशिक्षक स्मिता जलतकर तर सूस शाखेत योगतज्ञ डॉ. गजानन जोग व लता कोंढवे हे प्रमुख पाहुणे व योगशिक्षक म्हणून उपस्थित होते. चारही शाखांमध्ये सर्व योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी योगसाधना केली.
शरीर सुद्रुढ ठेवण्यासाठी योगा हे अत्यंत प्रभावी शस्त्र व शास्त्र आहे व सर्वांनी ते वापरावे असे संस्थेच्या संचालिका रेखा बांदल यांनी यावेळी सांगितले.
सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था ही ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले,निर्मल पंडीत व रुचीरा खानविलकर पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर,शिल्पा क्षीरसागर,शुभा कुलकर्णी,पूनम पांढरे,सना इनामदार व पल्लवी नारखेडे यांनी केले होते .
पेरिविंकल स्कूल मध्ये जागतिक योगा दिन साजरा करते प्रसंगी