Video: हत्तीचालक योगाभ्यासकाने पेलला हत्तीच्या ताकदीचा दोनशे किलो वजनाचा टायर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:39 PM2022-01-04T12:39:25+5:302022-01-04T12:39:35+5:30
तळजाई टेकडी येथे समकोणासन (स्ट्रेच साईड स्प्लिट) करत त्यांनी तब्बल दोनशे वीस किलो वजनाचा क्रेन पोकलेन टायर पेलून दाखवला
पांडुरंग मरगजे
धनकवडी: योग: कर्मसु कौशलं ! असं म्हटलं जातं. कौशल्याने कठीण कामही साध्य होते, हे योगाभ्यासक विठ्ठल कडू यांनी सिद्ध केले. तळजाई टेकडी येथे समकोणासन (स्ट्रेच साईड स्प्लिट) करत त्यांनी तब्बल दोनशे वीस किलो वजनाचा क्रेन पोकलेन टायर पेलून दाखवला. त्यांच्या या कौशल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
समकोणासणात (स्ट्रेच साईड स्प्लिट) दोन्हीही पाय विरुद्ध दिशेने फाकवून क्षितीज समांतर पातळीला आणणे कठीण असते. परंतु धनकवडी येथील चव्हाणनगर मध्ये राहणाऱ्या विठ्ठल कृष्णा कडू यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी ही किमया करून दाखवली आहे.
योगाभ्यासक विठ्ठल कृष्णा कडू हे छोटा हत्ती चालक असून कराटे प्रशिक्षक, ब्लॅकबेल्ट, गिर्यारोहक आहेत तसेच ते ३० वर्षै क्रिडा क्षेत्रात कार्यरत असून शिवशक्ती क्रिडा प्रतिष्ठान व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सवच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत आहेत.
पुण्यात योगाअभ्यासकाने पेलला दोनशे किलो वजनाचा टायर #Pune#yogapic.twitter.com/M9ZfQrDkxM
— Lokmat (@lokmat) January 4, 2022
विठ्ठल कडू यांनी नुकतेच तळजाई टेकडीवर हे आसन केले. तत्पूर्वी त्यांनी सराव म्हणून वेगवेगळी आसन करून पायातील ताकद वाढवत नेली. सुरुवात शंभर किलो वजन असलेल्या व्यक्तीला उभे करून सराव केला आणि वाढत वाढत दोनशे वीस वजन असलेल्या टायर घेऊन आसन केले.