जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:14+5:302021-02-09T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे. ...

Yoga is the way to become a better person in life | जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगमार्ग

जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योगमार्ग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे. जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग आहे,” असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वामी कुवलयानंद योग पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंद, सचिव ओमप्रकाश तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्राध्यापक आर. एस. भोगल आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा आणि विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करताना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहे. अपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणाले, “योग ही देश, विश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीर, मन, चेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहे.”

अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, तर योगाचार्या संध्या दीक्षित यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले. सुबोध तिवारी यांनी आभार मानले.

Web Title: Yoga is the way to become a better person in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.