योगाचार्य डॉ. प्रल्हाद वडगावकर यांच्या तीन ग्रंथांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:09+5:302021-02-17T04:15:09+5:30
या ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, न्युरो सर्जन ‘एस हॉस्पिटल’चे प्रमुख डॉ. सुरेश पाटणकर आणि ...
या ग्रंथांचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, न्युरो सर्जन ‘एस हॉस्पिटल’चे प्रमुख डॉ. सुरेश पाटणकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, आॅल इंडिया जैन समाजचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी न्यायमूर्ती मान्धाता झोडगे, ओबीसी संघटना प्रमुख डॉ. पोपट कुंभार, मोहन देशमाने, प्रताप गुरव, लक्ष्मण सुपेकर, नंदकुमार गोसावी, प्रकाशक सुनील गायकवाड (उंब्रजकर) आदी उपस्थित होते.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, वडगावकर यांचे ८५ वय असतानाही कोविड काळात वेळेचा सदुपयोग करून समाजासाठी हे तीन ग्रंथ निर्माण करून उत्तम कार्य केले, तसेच ओबीसी चळवळीसाठी मंडल आयोग लागू करण्यापासून ते आजतागायत काम करीत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलन विचाराशी बांधिलकी समजून दोन्ही मुलीचे आंतरजातीय विवाह करून जातीभेदाच्या पलिकडे जाऊन अखंड मानव जातीचे दर्शन दिले.
लवकरच महात्मा फुले यांच्या जीवनावर गीतचरित्र प्रकाशित होत असून, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्यावर देखील पोवाडे केल्याचे रघुनाथ ढोक यांनी सांगितले.
डॉ. उज्ज्वला गुळवणी यांनी स्वागत केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. संदीप सांगळे यांनी सूत्रसंचालन, तर रघुनाथ ढोक यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------