डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:54 AM2017-08-13T03:54:34+5:302017-08-13T03:54:37+5:30
जेजुरी येथील होळकर तलावाच्या शेजारील एका शेतातील शेडमध्ये डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून झाला. ही घटना दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
जेजुरी : जेजुरी येथील होळकर तलावाच्या शेजारील एका शेतातील शेडमध्ये डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून झाला. ही घटना दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
यशोदीप ऊर्फ हनुमंत तुकाराम आंबोले (वय २९, रा. रीसे-पिसे, ता.पुरंदर, जि. पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. या खूनाप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जेजुरी येथील होळकर तलावाशेजारील महेश सुभाष झगडे यांच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडचे काम चालू आहे. त्या शेडमध्ये एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाला असल्याची खबर शनिवार (दि.१२) रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास जेजुरी पोलिसांना मिळाली. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मयत तरुण यशोदीप आंबोले हा पुरंदर तालुक्यातील रीसे-पिसे (खोपडेवाडी) येथील रहिवासी आहे. गेल्या एक वर्षापासून तो त्यांचे मेव्हुणे तानाजी गणपत राजीवडे (रा. कोडीत बुद्रुक ता. पुरंदर, जि. पुणे) येथे राहत होता. रक्षाबंधनानंतर दि. ८ आॅगस्ट २०१७ रोजी यशोदीप याने मी चंदननगर येथे काम पाहण्यासाठी जातो, असे सांगून कोडीतवरून चंदननगर येथे गेला असे तानाजी राजीवडे यांनी फिर्यादीमध्ये नमूद
केले आहे.
होळकर तलावाशेजारी असणाºया एका शेतातील शेडमध्ये पोलिसांना या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निदर्शनास आले. अज्ञात इसमांनी शुक्रवार दि. ११ रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात कारणासाठी हा खून केला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची माहिती पोलिसांना मिळाली.