तुम्हाला घाबरत नाही, जी कारवाई करायची ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:11+5:302020-12-02T04:09:11+5:30

पुणे : मुख्यमंत्र्यांची भाषा ही धमक्यांची भाषा आहे. दसरा मेळावा असो नाही तर मुलाखत असो विरोधकांना वारंवार धमक्या दिल्या ...

You are not afraid, take whatever action you want | तुम्हाला घाबरत नाही, जी कारवाई करायची ती करा

तुम्हाला घाबरत नाही, जी कारवाई करायची ती करा

Next

पुणे : मुख्यमंत्र्यांची भाषा ही धमक्यांची भाषा आहे. दसरा मेळावा असो नाही तर मुलाखत असो विरोधकांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारच्या एक वर्षातील कामगिरीवर टीका केली. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोरोना काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. नियमित हप्ते भरणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदानही मिळालेले नाही. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून, शिक्षणाचाही बट्ट्याबोळ केल्याचे पाटील म्हणाले.

‘अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन’मुळे जनतेचे नुकसान

जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हणाले तर बिघडले कुठे? तर, मग आम्हीही उद्धव ठाकरेंना ‘उठा’, शरद पवारांना ‘शपा’, जयंत पाटील यांना ‘जपा’ असे म्हणू शकतो. तुम्ही आम्हाला विशेषणे लावणार असाल तर आम्हालाही बोलता येते; परंतु ही राजकीय संस्कृती नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून यावर विचार करायला हवा. जनतेच्या विकासाठी राजकीय आचारसंहिता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.

Web Title: You are not afraid, take whatever action you want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.