"तू पाकिस्तानी आहेस, तुझे व्हिडीओ व्हायरल करते..."; नस कापण्याची धमकी, पुण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:58 AM2022-12-21T08:58:52+5:302022-12-21T08:59:17+5:30

नस कापण्याची भीती दाखवून धमकी दिल्याचा प्रकार समोर...

"You are Pakistani, your videos go viral..."; The threat of severing veins, the Pune type | "तू पाकिस्तानी आहेस, तुझे व्हिडीओ व्हायरल करते..."; नस कापण्याची धमकी, पुण्यातील प्रकार

"तू पाकिस्तानी आहेस, तुझे व्हिडीओ व्हायरल करते..."; नस कापण्याची धमकी, पुण्यातील प्रकार

Next

पुणे : एकाच सोसायटीत राहणाऱ्या महिलेने दुसऱ्या महिलेला ‘तू पाकिस्तानी आहेस. यांना पाकिस्तानला पाठविले पाहिजे, तुझे व तुझ्या मुलीचे अंघोळीचे व्हिडीओ कसे व्हायरल करते बघ,’ असे सांगून नस कापण्याची भीती दाखवून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी महंमदवाडी येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून त्याच सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी या एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी महिला दारू पिऊन आली. तिने फिर्यादी यांना "तू पाकिस्तानी आहेस, येथे रॅकेट चालवते. तुमचे सर्वांचे पासपोर्ट काढून घेतले पाहिजे. यांना पाकिस्तानला पाठविले पाहिजे’, असे ती फिर्यादी व तिच्या पतीस वारंवार बोलत. ‘‘टेरेसवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून फिर्यादी यांना तुझे आणि तुझ्या मुलीचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करते," असे म्हणून धमकी दिली.

फिर्यादी व त्यांच्या मुलीवर पाळत ठेवून वारंवार स्वत:ची नस कापण्याची भीती दाखवून फिर्यादी यांच्या विरोधात पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. वारंवार फिर्यादीच्या चारित्र्यावरून अश्लील बोलल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक साठे तपास करीत आहेत.

Web Title: "You are Pakistani, your videos go viral..."; The threat of severing veins, the Pune type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.