"राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू", आशिष शेलारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:18 PM2021-08-24T20:18:12+5:302021-08-24T21:09:55+5:30

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत

"You started by arresting Rane, now we will finish," Ashish Shelar warned | "राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू", आशिष शेलारांचा इशारा

"राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू", आशिष शेलारांचा इशारा

Next
ठळक मुद्देभाजप कार्यालयावरील हल्ल्याचा शिवसेनेने तमाशा केला तर आम्ही तांडव करू

लाखेवाडी : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला व महाविकास आघाडी सरकारला इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिला.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध बोललेल्या एक सिनेमा चालेल एवढ्या वादग्रस्त वक्तव्याच्या सीडी आमच्याकडे आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

नारायण राणे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे यांना जाणून बुजून मुद्दाम केलेल्या अटकेचा शेलार यांनी निषेध केला. भाजप कार्यालयावरील हल्ल्याचा शिवसेनेने तमाशा केला तर आम्ही तांडव करू, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री व शिवसेना वर राहील असेही ते म्हणाले आहेत.

''महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांना बोलतानाच्या सीडी आम्ही उघडल्या तर हे एकमेकांवरच गुन्हे दाखल करतील ,अशी यांची परिस्थिती आहे. यापूर्वीही खासदार राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकमेकांना काय बोलत होते ,हे सर्वांना माहीत आहे. स्वातंत्र्य दिनाचा हीरक महोत्सव व अमृत महोत्सव याचा फरक मुख्यमंत्र्याला समजत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, या चुकीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.'' 
        
..हर्षवर्धन पाटील यांचेवर मोठ्या जबाबदारीचे संकेत

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपचे आज मोठे नेते आहेत, उद्याही मोठेच नेते राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील ते अतिशय अभ्यासू नेते आहेत. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी त्यांची चर्चा असते,असे नमूद करून भविष्यात हर्षवर्धन पाटील यांच्यावर निश्चितच मोठी जबाबदारी सोपविली जाईल, असे स्पष्ट संकेत आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना दिले.

Web Title: "You started by arresting Rane, now we will finish," Ashish Shelar warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.