तू नट होशील! पुण्यातील एका हस्तरेषाकाराने दिलीपकुमारांबद्दल वर्तविलेले भविष्य खरे ठरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:22 PM2021-07-07T21:22:00+5:302021-07-07T21:30:34+5:30
ऐकून कदाचित खोटं वाटेल, पण पुण्यातच एका हस्तरेषाकाराने ‘तू नट होशील’ असे दिलीपकुमारांना सांगितले होते आणि ते कालांतराने खरे झाले.
पुणे : पुण्यातील एका हस्तरेषाकाराने वर्तविलेले भविष्य खरे ठरले.. अभिनेते युसुफ खान उर्फ दिलीपकुमार यांच्या जीवनासह करिअरची पाळंमुळं महाराष्ट्रात रूजली आहेत. ऐकून कदाचित खोटं वाटेल, पण पुण्यातच एका हस्तरेषाकाराने ‘तू नट होशील’ असे सांगितले होते आणि ते कालांतराने खरे झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतले ते पहिले सुपरस्टार ठरले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद दिलीपकुमार यांचं सृष्टीतील बुधवारी (दि.७) निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानचे आज पहाटे त्यांना अखेरचा श्वास घेतला.
नाशिकमधील देवळाली येथे शिक्षण घेत असताना वडिलांच्या व्यवसायात नुकसान झाल्यामुळे कॉलेजच्या तिसऱ्या वर्षातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तेव्हा आर्मी कॉंट्रँक्टर असलेल्या वडिलांच्या मित्राने पुण्यातील खडकीच्या ब्रिटीश सैनिकांच्या कँटिनमध्ये त्यांना नोकरी लावली. तिथे असिटंट मॅनेजर म्हणून काम करीत असताना त्यांना 36 रूपये पगार मिळायचा. मात्र अधिक पैसा कमविण्यासाठी त्यांनी पुण्यात फळांचा देखील स्टॉल टाकला.
शहरात त्यांच्या फळांची विक्री करण्यासाठी सेल्सबॉय जात असतं. 22 रूपये त्यांची कमाई होत असे. युसुफ यांच्या आयुष्यातील ते अत्यंत आनंदाचे दिवस होते. त्या काळात त्यांनी खूप चांगला पैसा कमावला. घरी देखील ते पैसे पाठवत असतं. ब्रिटीश सैनिकांबरोबर ते फुटबॉल देखील खेळत असतं. त्यानंतर ते मुंबईला गेले..पण पुण्याशी त्यांचे ॠणानुबंध जुळले ते अगदी कायमचेच! महाराष्ट्रात शिक्षण झाल्यामुळे मराठीवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात भाषण किंवा संवाद साधताना त्यांना विशेष कधी अडचण जाणवली नाही.
------------------------