लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, नागपूरच्या जोडप्याला अटक, सायबर क्राइमची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 08:07 PM2017-11-27T20:07:04+5:302017-11-27T20:07:18+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाºया नागपूरच्या जोडप्याला पुणे सायबर क्राइमने अटक केली आहे. 

Young cheating by giving marriage bait, arrest of Nagpur couple, cybercrime performance | लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, नागपूरच्या जोडप्याला अटक, सायबर क्राइमची कामगिरी

लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, नागपूरच्या जोडप्याला अटक, सायबर क्राइमची कामगिरी

Next

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाºया नागपूरच्या जोडप्याला पुणे सायबर क्राइमने अटक केली आहे. किशोर चुडामन रामटेककर (वय ३४) आणि त्याची पत्नी रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (वय २८, रा. विद्यानगर, वाठोडी, नागपूर) अशी त्यांची नावे आहेत.
अनेक तरुण मुले-मुली लग्नासाठी अनेक मेट्रोमोनी साईटवर त्यांची नावे नोंदवितात. त्यांना मेट्रोमोनी साईटवरील प्रोफाईलवरून लग्नाची मागणी आल्यावर त्यामध्ये सुंदर फोटो व चांगल्या नोकरीचे आमिष दाखविले जाते व लग्नाबाबत मोबाईलवर बोलणे व चॅटिंग करून भावनिक गुंतवणूक करून एखादी घटना घडलेली आहे, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडले जाते. अशाच प्रकारे या दोघांनी मुलांना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. रामटेककर याने आपल्या पत्नीचे काव्या असलकर, पल्लवी असलकर या नावाने मेट्रोमोनी साईटवर नाव नोंदवून ठेवले होते़ 
सिंहगड रोड येथे राहणा-या एका ३१ वर्षांचा आयटी इंजिनिअरचा घटस्फोट झाला होता.  त्याने पुनर्विवाहासाठी एका मेट्रोमोनीवर नाव नोंदविले होते़ त्याला पल्लवी असलकर नावाच्या मुलीने संपर्क साधला़ दोघांचे एकमेकांशी फोन व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग चालू झाले होते़ तिने आपण झारखंड येथील रायगडला पीडब्ल्यूडीमध्ये नोकरीस असल्याचे व वडिलांचा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असल्याचे सांगितले़ एके दिवशी वडिलांना हार्ट अटॅक आलेला असून तिला पैशाची अत्यंत गरज असल्याचे सांगून या तरुणाकडे २ लाख १५ हजार रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे या तरुणाने बँकेत पैसे भरले़ त्यानंतर तिने वडिलांचे निधन झाल्याचे कळविले़ नंतर या तरुणीचा फोन बंद झाला़ त्याने रायगड येथे जाऊन चौकशी केल्यावर अशी कोणी तरुणी येथे काम करीत नसल्याचे सांगितले. संशय आल्याने त्याने सायबर क्राईमकडे तक्रार केली होती. 
याच प्रकारे सांगवी येथे राहणा-या ३२ वर्षांच्या तरुणाची २ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यामधील मुलीचे नाव काव्या असलकर होते़ तिचा मोबाईल नंबर राजस्थानमधील होता़ या गुन्ह्यांचा समातंर तपास सायबर क्राईम सेलकडून करण्यात येत होता़ पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक निरीक्षक स्वप्नाली शिंदे, हवालदार अस्लम आत्तार, सरिता वेताळ व त्यांच्या सहका-यांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल डाटाच्या माहितीचे पृथक्करण करून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढून नागपूरहून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ मोबाईल, युनियन बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड, तसेच वेगवेगळ्या नावाने तयार केलेले बनावट आधारकार्ड, मतदार कार्ड, डेबिट कार्ड व पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे.
रिंकी एका बँकेत कामाला होती. सध्या काही करीत नाही, तर किशोर रामटेककर बँकेत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे काम करीत होता़ त्यांना कर्ज झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते अशा प्रकारे फसवणूक करीत होते़ आरोपीने आणखी ७ ते ८ तरुण मुलांची २० लाख रुपयांची फसवणूक केली असावी, असे दिसून येत होते़ आरोपींकडील मोबाईलमधील नंबरची पडताळणी केली असता त्यांनी पुण्यासह मुंबई व अन्य काही शहरांतील तरुणांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी तत्काळ पुणे शहर सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मेट्रोमोनी साईटवर नाव नोंदविले असल्यास समोरील व्यक्तीची खात्री करावी़ प्रत्यक्ष भेट घेऊन त्या व्यक्तीची शहानिशा करावी, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Young cheating by giving marriage bait, arrest of Nagpur couple, cybercrime performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा