Video: 'आखो मे बसे हो तुम तुम्हे दिल मे छुपा लुंगा', पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट, रिल्सचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 14:47 IST2024-06-16T14:46:25+5:302024-06-16T14:47:46+5:30
पुण्याच्या हडपसर भागात एक तरुणी हात सोडून बाईक चालवण्याचा अजब प्रकार समोर

Video: 'आखो मे बसे हो तुम तुम्हे दिल मे छुपा लुंगा', पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट, रिल्सचा व्हिडिओ व्हायरल
पुणे : पुण्यातील हडपसर भागात तरुणीचा हात सोडून बाईक चालवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. रिल बनवण्याच्या नादात तरुणीकडून हा जीवघेणा स्टंट करण्यात आल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. तरुणीचा स्टंट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून पोलीस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
पुण्यातील हडपसर भागातून एका तरुणी यामाहा गाडी हात सोडून चालवल्याचा अजब प्रकार करत आहे. आखो मी बसे हो तुमे दिल मी छुपा लुंगा या गाण्यावर तरुणी रिल्स करत हा जीवघेणा प्रकार करतीये. पिंपरी भागातूनही याआधी चालत्या कारवर बसून स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला शिक्षाही सुनावण्यात आली होती. आता पुन्हा हडपसर भागातून या तरुणीचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पोलीस कारवाई करणार का? याकडे समाजाचे लक्ष लागून आहे.
'आखो मी बसे हो तुमे दिल मी छुपा लुंगा', पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट, रिल्सचा व्हिडिओ व्हायरल#pune#reel#trafficrules#policepic.twitter.com/aP3WOtc0o6
— Lokmat (@lokmat) June 16, 2024
पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. तरुण तरुणींना काहीही चूक नसतानाही जीव गमावावा लागतोय. शहरात सर्वत्र वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसतीये. पोर्शे अपघातानंतर तशाच प्रकारे उडवण्याच्या घटना पुणे, पिंपरी शहरात घडू लागल्या आहेत. अजूनही तरुण बाईकवरून रात्री फिरताना नियमांचे पालन करत नाहीत. कशाही प्रकारे वेडीवाकडी वाहने चालवून स्वतः बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशातच जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समोर आलाय. तरुण तरुणींनी असे जीवघेणे स्टंट करू नये. तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.