‘एमपीएससी मायाजाल’ असल्याचे म्हणत तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:02+5:302021-07-04T04:09:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व बिकट आर्थिक ...

Young man commits suicide by claiming to be an MPSC magician | ‘एमपीएससी मायाजाल’ असल्याचे म्हणत तरुणाची आत्महत्या

‘एमपीएससी मायाजाल’ असल्याचे म्हणत तरुणाची आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व बिकट आर्थिक परिस्थितीतून स्वप्निल सुनील लोणकर (वय २४, रा. गंगानगर, फुरसुंगी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे.

स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.

स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.

Web Title: Young man commits suicide by claiming to be an MPSC magician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.