...त्या युवकाने कुंचल्यातून रेखाटली बारामती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:07+5:302021-07-09T04:08:07+5:30
शहरातील भिगवण चौकात हे आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. या आवारातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शहरातील प्रसिद्ध ठिकाण, ...
शहरातील भिगवण चौकात हे आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. या आवारातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह शहरातील प्रसिद्ध ठिकाण, व्यक्ती, मंदिरांची चित्रे रेखाटली आहेत. यामध्ये दीपक याने येथील काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचीदेखील हुबेहूब चित्र रेखाटली आहेत. दीपक मुंबई येथे कला विद्या संकुलात रेखा व रंगकला या विषयाच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे शिक्षण बंद असल्याने तो घरीच आहे. आरोग्य विभागात काम करत असलेल्या तरुण मित्रांनी त्याला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देत त्यासाठी लागणारे रंग व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मदत केली आहे. या चित्रांमुळे परिसराचा कायापालट झाला आहे. दीपक रणपिसे या कालाकाराने हुबेहूब चित्र रेखाटली आहेत. येथे येणाऱ्या लोकांना या चित्रातून शहरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, असे आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, चंदन लालबिगे, अक्षय बिवाल, रणधीर लोहाट, राहुल जेधे, कुणाल विवाल, मनीष लालबिगे, अशोक कांबळे, रितेश जाधव, अक्षय लांडगे, रवी वाडिया यांनी दीपक यास सहकार्य केले.
बारामती नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या आवारात एका कलाकार युवकाने कुंचल्यातून चित्र रेखाटली आहेत.
०७०७२०२१ बारामती—१९
०७०७२०२१ बारामती—२०