सोनसाखळी पळविणाऱ्या चोरट्याला तरुणाने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:18 AM2018-03-16T00:18:46+5:302018-03-16T00:18:46+5:30
जेवणानंतर घराबाहेर शतपावली करणा-या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रयत्न करणा-या चोरट्याला पकडून चतु:श्रृगी पोलिसांच्या हवाली केले. ही घटना सुतारवाडी सूस रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडला.
पुणे : जेवणानंतर घराबाहेर शतपावली करणा-या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रयत्न करणा-या चोरट्याला पकडून चतु:श्रृगी पोलिसांच्या हवाली केले. ही घटना सुतारवाडी सूस रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडला.
विष्णु कमलाकर कांबळे (वय २०) असे या चोरट्याचे नाव आहे़ याप्रकरणी पराग पांडुरंग सूर्यवंशी (वय २२, रा़ सुतारवाडी) असे चोरट्याला पकडून देणा-या तरुणाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, पराग सूर्यवंशी हा मॉडर्न कॉलेजमध्ये बी. ए़च्या तिस-या वर्षाला शिकत असून त्याचे वडिल पोलीस निरीक्षक आहेत. रात्री जेवण झाल्यावर तो शतपावली करीत होता. त्यावेळी मोटारसायकलवरील दोघांनी त्याच्या भोवती फे-या मारल्या. तो मोबाईलवर बोलत असतानाच एकाने खाली उतरुन त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली़ त्याने तातडीने त्याच्या तोंडावर मोबाईल मारला व आरडाओरडा केला़ चोरट्याबरोबर त्याची झटापट झाली़ तो पळून जाऊन साथीदाराच्या मोटारसायकलवर बसला़ तेव्हा परागने त्याला पकडून खेचले़ त्यामुळे तो खाली पडला़ त्याचवेळी अन्य दोन तीन जण त्याच्या मदतीला धावले़ हे पाहून मोटारसायकलवरील साथीदार पळून गेला़ त्याने विष्णु कांबळे याला पकडून पोलिसांच्या हवाली केले़ चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते़