पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:38+5:302021-05-31T04:08:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणाच्या डोक्यात फरशीने मारहाण करून कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. योगेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणाच्या डोक्यात फरशीने मारहाण करून कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला.
योगेश रवींद्र नगरकर (वय २९, रा. जांभूळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांचे वडील रवींद्र नगरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दत्तनगर रस्त्यावरील तिरंगा चौकात शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांनी काही दिवसांपुर्वी एकाकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, पैसे वेळेत परत न दिल्यामुळे संंबंधिताने शनिवारी योगेशला तिरंगा चौकात बोलावून घेतले. त्यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने योगेशच्या डोक्यात फरशीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर टोळक्याच्या मदतीने योगेशवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे तपास करीत आहेत.