सोसायटीच्या नोंदणीसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:18+5:302021-03-22T04:10:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीचे अभिहस्तांतरण करून नोंदणी करण्याची मोहीम सहकार विभागाने सुरू केली आहे. सोसायटीच्या नोंदणीसाठी पुढाकार ...

The young man who took the initiative to register the society was beaten | सोसायटीच्या नोंदणीसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाला मारहाण

सोसायटीच्या नोंदणीसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाला मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सोसायटीचे अभिहस्तांतरण करून नोंदणी करण्याची मोहीम सहकार विभागाने सुरू केली आहे. सोसायटीच्या नोंदणीसाठी पुढाकार घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सोसायटीच्या फाइल्सची मागणी केल्याचा राग येऊन सोसायटीतील तिघांनी बाहेरच्या ७ ते ८ जणांना बोलावून तरुणाला फायटर आणि खुर्चीने मारहाण केली.

याप्रकरणी निखिल बधे (वय २४, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राकेश वाणी, त्यांच्या पत्नी, अभिजित खळदकर आणि ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना न-हे रोडवरील वृंदावन नक्षत्र सोसायटीत १९ मार्च रोजी मध्यरात्री घडली.

फिर्यादी निखिल आणि आरोपी वाणी हे एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी व सोसायटीतील इतर सभासदांनी आरोपींकडे साेसायटीच्या मीटिंग फाइल्स संदर्भात विचारणा केली. त्याचा राग मनात धरून वाणी, खळदकर यांनी त्यांच्या ओळखीच्या ७ ते ८ जणांना सोसायटीमध्ये मध्यरात्री बोलावले. निखिल यांना तुम्हाला काय माज आलाय का, आज तुमचा माज उतरवितो, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तोंडावर फायटरने ठोसा मारून व लोखंडी खुर्चीने मारहाण करून जखमी केले. तसेच सभासद राहुल वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले.

Web Title: The young man who took the initiative to register the society was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.