लोणावळ्याच्या जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह; एकटा फिरताना हरवल्यानंतर संपर्क झाला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 05:57 PM2022-05-25T17:57:49+5:302022-05-25T17:58:08+5:30

हौशी तरुण पर्यटक लोणावळ्याच्या या घनदाट अरण्यात आणि दऱ्यामध्ये वाट न सापड्याने चुकतात

Young man's body found in Lonavla forest; Contacted after losing while walking alone, but ... | लोणावळ्याच्या जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह; एकटा फिरताना हरवल्यानंतर संपर्क झाला, पण...

लोणावळ्याच्या जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह; एकटा फिरताना हरवल्यानंतर संपर्क झाला, पण...

googlenewsNext

गणेश खंडाळे

पुणे :  हौशी तरुण पर्यटक लोणावळ्याच्या या घनदाट अरण्यात आणि दऱ्यामध्ये वाट न सापडल्याने चुकतात. अनेकदा वेळेवर संपर्क झाल्याने मदत मिळते. अनेकांच्या नशिबामध्ये मदत नसते. फरहान अहमद (२४, रा. दिल्ली) हा तरुण शुक्रवारी (दि. २०)  लोणावळ्याच्या जंगलात बेपत्ता झाला. त्यानंतर चार दिवसांनंतर फरहानचा मृतदेह मिळाला. व्यवसायाने अभियंता असणारा फरहान अहमद हा कोल्हापूरला काही कामानिमित्त दिल्लीहून आला होता. हातात वेळ असल्यामुळे त्याने पवना धरण परिसरामध्ये एक रिसॉर्ट बुक केले. त्यानंतर सकाळीच तो नागफणी शिखर परिसरात भटकंतीसाठी एकटाच बाहेर पडला. शुक्रवारी ज्या ठिकाणी तो फिरायला गेला त्या ठिकाणचा सेल्फी काढून त्याने आपल्या भावला पाठविला होता.

मेलेल्या म्हशीच्या वासाने भटकले शोधकर्ते

पोलिसांना फहरानचे जे लोकेशन मिळाले त्या सर्व लोकेशनवर सर्च केल्यामुळे बराच वेळ गेला. ज्या ठिकाणी फरहान पडला होता. त्या ठिकाणी शिवदुर्गच्या रेस्कूअर्सना वास येत होता. परंतु खाली दरीमध्ये एका म्हशीचा मृतदेह सडला होता. त्याचा वास येत असावा असे वाटल्यामुळे पोलिसांना त्याचे जे सॅटेलाइट लोकेशनवर शोधकार्य चालू होते ते फहरानने शेवटचे जे लोकेशन पाठविले ते होते. त्याच जागेवर त्याचा दरीमध्ये मृतदेह आढळून आला.

तेव्हाच मदत मागितली असती तर...

ज्या दिवशी फरहान नागफणीच्या दरीमध्ये बेपत्ता झाला. त्या दिवशी शिवदुर्ग मित्र या लोणावळ्याच्या गिर्यारोहकांचा एक गट गिर्यारोहण करीत होता. फरहान त्या दिवशी या गटातील मुलांना भेटला होता. त्यांच्याकडून पाणी मागून पिला होता. त्या दिवशी त्याच्या व्यतिरिक्त अन्य दुसरा पर्यटक आलाच नव्हता. जेव्हा या सराव करणाऱ्या मुलांना समजले की एक जण बेपत्ता झाला आहे, तेव्हा शिवदुर्गची टीम ठाम होती की फरहानच तो मुलगा होता आणि याच मुलाला आपण पाणी पाजले होते.

वडिलांनी जाहीर केले लाखाचे बक्षीस

फरहान बेपत्ता झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला शोधून देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस कालच जाहीर केले होते. परंतु आज त्याचा मृतदेहच सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे.

अदयाप ८ जणांचा शोध लागला नाही 

शिवदुर्ग मित्र संस्थेने मागील २० वर्षांत लोणावळा परिसरातील जंगल व डोंगरांगांमध्ये एक हजारांपेक्षा अधिक पर्यटक बेपत्ता झाले त्यांच्या शोध घेतला आहे. यापैकी  ३०० तीनशे बेपत्ता पर्यटकांचे मृतदेह सापडले. या बेपत्ता लोकांपैकी आठ जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही.  

घ्यावयाची काळजी

- मदत मिळविण्यासाठी तुम्ही चुकलेल्या ठिकाणचे लोकेशन पाठविल्यानंतर त्याच ठिकाणी थांबून राहून मदतीची वाट पहावी.

- केवळ मोबाइल ॲप आणि तंत्रज्ञानावर निर्धारित न राहता स्थानिक वाटाड्या, नागरिकांची मदत घ्यावी.

- एकट्याने जंगलात फिरणे टाळावे. जीवनावश्यक गोष्टी (अन्न, पाणी, प्रथमोपचार) या गोष्टी जवळ बाळगाव्यात.

गुगल आणि वास्तव यातला फरक समजावून घ्या

बाहेरच्या राज्यातील तरुण मुले असतात. त्यांना महाराष्ट्राच्या गुगल मॅप सह्याद्रीचा टेरेन माहीत असतो. परंतु, प्रत्यक्षात तंत्रज्ञान दिशाभूल करते. जर एखादा नागफणीला आला तर गुगलवर त्याचे लोकेशन नागफणी असे दिसते. परंतु जर तो नागफणीवरून खाली पडला तरी त्याचं लोकेशन नागफणीचा टॉप. स्थानिक वाटाडे, नागरिक यांची मदत घेऊन माहिती घेतल्याशिवाय या अशा प्रकारचे धाडस करू नये असे सुनील गायकवाड (सचिव, शिवदुर्ग मित्र, लोणावळा) यांनी सांगितले आहे.  

Web Title: Young man's body found in Lonavla forest; Contacted after losing while walking alone, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.