तरुणींनी गुंगीचे औषध देऊन तरुणांना लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:49+5:302021-02-05T05:00:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ काढून त्याद्वारे तरुणीला धमकाविण्याचे प्रकार यापूर्वी ...

The young men robbed the young men by giving them drugs | तरुणींनी गुंगीचे औषध देऊन तरुणांना लुबाडले

तरुणींनी गुंगीचे औषध देऊन तरुणांना लुबाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ काढून त्याद्वारे तरुणीला धमकाविण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. मात्र, आता तरुणींनीच तरुणांना प्रेमात फसवून त्यांना हॉटेलमध्ये बोलावून गुंगीचे औषध देऊन लुबाडण्याच्या दोन घटना चंदननगर परिसरात घडल्या आहेत.

याप्रकरणी सांगली येथील एका २४ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. या तरुणाची प्रिया नावाच्या तरुणीशी टिंडर ऑनलाईन डेटींग ॲपवर ओळख झाली होती. तिने ३ जानेवारी रोजी या तरुणाला रॉयल रेसिडन्सी लॉजवर बोलविले. तेथे ड्रिंक्स घ्यायचे असल्याचे सांगून त्याच्या ग्लासमध्ये गुंगीचे औषध मिसळले. ड्रिंक्स घेतल्यावर हा तरुण बेशुद्ध पडला. त्यानंतर या तरुणीने ३१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, मोबाईल असा १ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केला होता. बदनामी व घराच्या लोकांना समजेल, म्हणून त्याने इतके दिवस तक्रार दिली नव्हती.

अशीच घटना २७ जानेवारी रोजी ड्रीम्स स्काय ओयो लॉजमध्ये घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूरच्या एका ३३ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. एका तरुणीने या तरुणाच्या दारुच्या ग्लासमध्ये गुंगी आणणारा पदार्थ टाकून दारु पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर त्याला गुंगी आल्यावर त्याच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन तरुणी पळून गेली.

वाकड येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तरुणीने आशिषकुमार याला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील दीड लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना १८ जानेवारीला घडली होती. एका पाठोपाठ अशा तीन घटना घडल्या असून हे सर्व गुन्हे एकाच तरुणीने केले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. यापूर्वी हडपसर परिसरात अशा घटना घडल्या होत्या.

Web Title: The young men robbed the young men by giving them drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.