युवा चित्रकार वर्षा खरटमल यांना ‘राष्ट्रीय अभ्युदय्’ सन्मान प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:05+5:302020-12-04T04:28:05+5:30
पुणे : २५ व्या आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टीव्हल २०२० मध्ये पुण्याच्या युवा चित्रकार वर्षा रामचंद्र खरटमल (माने) यांना राष्ट्रीय अभ्युदय ...
पुणे : २५ व्या आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टीव्हल २०२० मध्ये पुण्याच्या युवा चित्रकार वर्षा रामचंद्र खरटमल (माने) यांना राष्ट्रीय अभ्युदय सन्मान प्रदान करण्यात आला.
कलावर्त न्यास उज्जैन (म.प्र.) ही संस्था गेली ३१ वर्ष भारतीय समकालीन कला क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. दरवर्षी कलावर्त न्यास द्वारे कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय व सृजनात्मक कामगिरी करणाऱ्या युवा कलावंताचा ‘अभ्युदय सम्मान’ देऊन गौरव करण्यात येतो. यंदा वर्षा रामचंद्र खरटमल (माने) यांना हा सन्मान प्रदान केला. सन्मान पत्र, स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप आहे. सध्या कोविड पार्श्वभूमीवर चार दिवसाची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व पुरस्कार सोहळा डिजीटल माध्यमातून पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॅा. चंद्रशेखर काळे व सर्व निवड समिती सदस्यींचे आभार मानले. युवा चित्रकार वर्षा खरटमल या मूकबधिर आहेत. आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.