Pune Police | पुण्यात पकडलेला तरुण पाकिस्तानी? पुणे पोलिसांनी केला मोठा खुलासा

By विवेक भुसे | Published: March 15, 2023 12:09 PM2023-03-15T12:09:05+5:302023-03-15T12:12:25+5:30

पाकिस्तानी नागरिक म्हणून केली अटक...

Young Pakistani caught in Pune The police disclosed reality muhammad aman ansari | Pune Police | पुण्यात पकडलेला तरुण पाकिस्तानी? पुणे पोलिसांनी केला मोठा खुलासा

Pune Police | पुण्यात पकडलेला तरुण पाकिस्तानी? पुणे पोलिसांनी केला मोठा खुलासा

googlenewsNext

पुणे : बेकायदशीर कागदपत्राशिवाय पुण्यात वास्तव्य करणार्‍या व खोटी कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविणार्‍या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्यामागील कारण लक्षात घेतल्यावर आई वडिलांच्या कौटुंबिक भांडणात आजीकडे येऊन राहिलेल्या तरुणाची फरफट झाल्याचे दिसून येत आहे.

महम्मद अमान अन्सारी (वय २२, रा. भवानी पेठ) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पाकिस्तानी नागरिक पडताळणी विभागाचे पोलीस अंमलदार केदार जाधव यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डी राजा यांनी माहिती दिली.

महम्मद अन्सारी याची आई ही भारतीय आहे. तिचा पाकिस्तानी नागरिक असलेल्या अमान यांच्याशी निकाह झाला होता. लग्नानंतर त्या पाकिस्तानला गेल्या होत्या. त्यांचा युएईला वास्तव्य करण्याचा विचार होता. दरम्यान, त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाला. त्याची आई सध्या युएईमध्ये वास्तव्याला आहे. महम्मद हा जन्माने पाकिस्तानी आहे. युएईला राहणार्‍या आईने त्याच्या शिक्षणासाठी २०१५ मध्ये महम्मद याला पुण्याला आपल्या आई व भावाकडे पाठविले. अल्पवयीन असताना तो पुण्यात आला. पुण्यात तो शिक्षण घेत असताना त्याने आपला पाकिस्तानी जन्म असल्याचे लपवून ठेवून येथील खोटी कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविला. त्याने खोटी कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविला. त्याचा वापर करुन त्याने पुणे व दुबई विमान प्रवास करुन तो आपल्या आईलाही भेटायला गेला होता असे तो सांगतो.

दरम्यान, विशेष शाखेच्या परदेशी नागरिक पडताळणी विभागातील पोलीस परदेशी नागरिकांचा शोध घेत असताना त्यांना महम्मद अन्सारी याची माहिती मिळाली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने बेकायदेशीरपणे वास्तव करीत असून त्याने बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट बनविला असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे वडिल सध्या काय करतात़ तो दुबईला कशासाठी गेला होता़ इतरांशी काही संबंध आहे का? तसेच अन्य माहिती घेत असल्याचे पोलीस उपायुक्त डी राजा यांनी सांगितले.

Web Title: Young Pakistani caught in Pune The police disclosed reality muhammad aman ansari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.