Brain Fog | तरुणांनो रिल्सच्या फंदात पडू नका; होईल ब्रेन फॉगचा धोका...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:45 AM2023-02-02T11:45:25+5:302023-02-02T11:47:18+5:30

हे रिल्स सतत पाहत असल्यामुळे अनेकांना ब्रेन फॉग होतोय...

Young people do not fall into the trap of reels; There will be a danger of brain fog...! | Brain Fog | तरुणांनो रिल्सच्या फंदात पडू नका; होईल ब्रेन फॉगचा धोका...!

Brain Fog | तरुणांनो रिल्सच्या फंदात पडू नका; होईल ब्रेन फॉगचा धोका...!

googlenewsNext

पिंपरी : तरुण व तरुणी वेळ घालवण्यासाठी मोबाइलवर अनेक ॲपवर रिल्स पाहत असतात. सतत बनवत असतात. हे रिल्स सतत पाहत असल्यामुळे अनेकांना ब्रेन फॉग, स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष न लागणे, थकवा येणे, चिडचिडेपणा, सुस्तीची भावना येणे अशी लक्षणे दिसून येतात त्यामुळे तरुणांनी मोबाइल कमी हाताळणे गरजेचे आहे.

सोशल मीडियावर अनेक ॲप उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना इन्स्टाग्राम, चिंगारी, जोश यांसारख्या ॲपचे माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेकजण वेळ घालवण्यासाठी रिल बघत बसतात. मात्र, एकामागोमाग येणारे व्हिडीओ सतत पहिल्याने त्यांची सवय लागते. तासान्तास रिल पाहिल्यामुळे तरुणाईला ब्रेन फॉगच्या त्रासला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच सतत मोबाइलवर गेम खेळण्यामुळेदेखील हा त्रास होतो. जास्तवेळ मोबाइल खेळत असल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, विचारात सुसंगतता नसणे, चिडचिडपणे येणे तसेच आळस वाढतो.

रिल्समुळे जागरण वाढले

सोशल मीडियावर रिल्स पाहण्याच्या सवयीमुळे वेळ कसा निघून जातो हे कळत नसल्यामुळे जागरण वाढले आहे. त्यामुळे झोप होत नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. जागरणामुळे विविध शारीरिक व्याधीने तरुण ग्रासू शकतात. त्यामध्ये अपचन, ॲसिडिटी, अस्वस्थ वाटणे असा त्रास नेहमीच होऊ शकतो.

..अशी घ्या काळजी

- मोबाइलचा वापर कमी करावा.

- स्क्रीन टाइम लॉक ॲपचा वापर करावा.

- योग्य वेळी मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

- पुस्तक वाचन, खेळ यामध्ये वेळ घालवावा.

- मोबाइलमध्ये रिल्स अथवा इतर सोशल ॲप पाहण्याचा वेळ निश्चित करावा.

ब्रेन फॉग म्हणजे काय?

मानसिक थकवा येणे, झोप न येणे, मानसिक थकवा येणे, याशिवाय चिडचिड होणे, संवाद कमी होणे. अशा अनेक बाबी रिल्स तसेच स्मार्ट फोनचा अतिप्रमाणात वापर केल्याने होतात. यालाच ब्रेन फाॅग असे म्हणतात.

मोबाइलचा जास्तीत जास्त वापर केल्यास मेंदूच्या रसायनांमध्ये बदल होतो. चिडचिडेपणा वाढतो. मानसिकता बदलते. अचलबिचलता निर्माण होते व स्थिरता राहत नाही. मानसिक आजार तसेच शारीरिक आजार वाढतात.

- डॉ. पूजा मिसाळ, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Young people do not fall into the trap of reels; There will be a danger of brain fog...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.