तरुणांनी दिले हरणाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 01:57 AM2016-04-25T01:57:44+5:302016-04-25T01:57:44+5:30
सद्य:स्थितीतील वाढते तापमान व तीव्र दुष्काळी झळांमुळे ग्रामीण भागातील जनतेबरोबरच वन्यप्राण्यांच्याही जिवाची काहिली होऊ लागली आहे.
वासुंदे : सद्य:स्थितीतील वाढते तापमान व तीव्र दुष्काळी झळांमुळे ग्रामीण भागातील जनतेबरोबरच वन्यप्राण्यांच्याही जिवाची काहिली होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी भटकंती करूनही पुरेसा चारा व पाणी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याने पाण्यावाचून वन्यप्राण्यांची घालमेल होत आहे. वासुंदे परिसरात पाण्यासाठी भटकंती करताना एक हरिण कासावीस झाले होते. परंतु तरुणांच्या सतर्कतेने त्या हरणाला जीवदान मिळाले. शनिवार (दि. २३) येथील शेतजमीन गट नं. १७२ मध्ये एक हरिण पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना घायाळ होऊन झुडपात अडकले असल्याचे चांगदेव खोमणे या युवकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ माजी सरपंच लीलावती खोमणे, विठ्ठल खोमणे, सुरेश खोमणे, जयराम खोमणे, हेमंत साळुंके, शहाजी खोमणे, योगेश खोमणे, आकाश साळुंके व इतर युवकांच्या सहाय्याने त्यास सुरक्षित स्थळी नेऊन पाणी पाजले.