ग्रामीण भागातील युवक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:10+5:302021-05-13T04:12:10+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव आहे त्यामुळे रेंज मिळत नाही, ही सेवा खंडित होत असते. ...
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव आहे त्यामुळे रेंज मिळत नाही, ही सेवा खंडित होत असते. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी होत नाही. नोंदणी नसल्याने ते लसीकरण करण्यापासून वंचित राहतील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी जुन्नर तालुक्यातील फक्त ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातच सुविधा दिली आहे. शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागातील पिनकोड टाकून रजिस्ट्रेशन करतात व ते ग्रामीण भागातील एकमेव केंद्रात येऊन गर्दी करतात. शासन जेवढी लस देते तेव्हढीच लस देतात. काही शहरी नागरिक ऑनलाईन नोंदणी करतात. परंतु लसीकरण करण्यासाठी येत नाही. लस शिल्लक राहते, कधी संपते त्याचा हिशेब ठेवावा लागतो. या ऑनलाईन पद्धतीने केंद्रातील कर्मचारी वर्गाचे काम वाढले आहे. इंटरनेट सुविधा नसल्याने नोंदणी केलेल्या लसधारकांचे मोबाईल नंबर शोधणे हे जिकिरीचे होत आहे. शहरातील नागरिकांना शहरात ऑनलाईन पध्दतीने नावे नोंदणी करणे, त्यात प्रभाग वार्ड, रस्ता, पेठ असे विभाग केल्यास शहरातील नागरिक तेथेच नोंदणी करू शकतील. ग्रामीण भागात ते नोंदणी करणार नाही व तेथे गर्दी होणार नाही.त्यामध्ये ही वयोगट निहाय १८ ते २४, २५ ते ३४, ३५ ते ४४ असे गट केले तर प्रत्येक गटात नोंदणी केलेल्या नागरिकांना सूचना देणे सोपे जाणार आहे असे निवेदनात नमूद केले आहे.